लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. अशा घटना रोखण्यासाठी तसेच देशभरातील तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या वडिलांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. वसईत रविवारी या ट्रस्टचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात असूनही या प्रकरणाचा निकाल लागला नसल्याची खंत श्रद्धाच्या वकील ॲड सीमा कुशवाहा यांनी व्यक्त केली

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची २०२२ मध्ये तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने दिल्लीत निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले होते. मयत श्रद्धाचे वडील विकास वालकर मागील दोन वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. या विरोधात एक लढा उभारण्यासाठी आणि मुलींमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना केली आहे. रविवारी वसईत या ट्रस्टचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या तसेच श्रद्धा वालेकर प्रकरण न्यायालयात लढणाऱ्या वकील ॲड सीमा कुशवाह उपस्थित होत्या.

आणखी वाचा-मनवेलपाडा तलावात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

अशा हत्याकांडा विरोधात देशभरातून संताप व्यक्त होतो. पण हे प्रकरण जलतगती न्यायालयात असूनही अनेक तांत्रिक गोष्टीमुळे निकाल लवकर लागत नाही. या विलंबामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष देखील तिच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी मिळू शकले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या प्रकारे चौकांना फाशीची शिक्षा मिळवून दिली त्याप्रमाणे श्रद्धा वालकर प्रकरणात न्याय मिळवून देणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक कार्यांबरोबर मुलींमध्ये जनजागृती करणे, त्यांचे समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची माहिती श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी दिली. यावेळी जाणीव संस्थेचे मिलींद पोंक्षे, माजी महापौर प्रवीण शेट्टी उपस्थित होते