वसई- यंदाच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरलेल्या बहुजन विकास आघाडीला केवळ २ लाख ५४ हजार मते मिळाली आहे. २०१९ च्या निवडणूकीपेक्षा निम्याने मते कमी झाली आहेत. बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे भाजपाला मत हा विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा बविआला फटका बसला आणि त्यामुळे बविआ तिसर्‍या स्थानावर फेकली गेली.

पालघर लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. याशिवाय पालघऱ, बोईसर, डहाणू आणि विक्रमगड मध्ये पक्षाने आपली पाळेमुळे घट्ट केली असून ग्रामपंचायती, विविध संस्था, सहकार, कृषी आदी क्षेत्रात आपले पाय रोवले होते. त्यामुळे जिल्ह्यात बविआ चांगली लढत देणार अशी अटकळ होती. याच जोरावर बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना रिंगणात उतरवले होते. बविआची सारी भिस्त बोईसर, वसई आणि नालासोपारा मतदारसंघावर होती. परंतु बविआला नालासोपार्‍यातून ७९ हजार ४६०, बोईसर मधून ६५ हजरा २९१ आणि वसईतून अवघी ५० हजार ८६८ मते मिळाली आहेत. सर्व मतदारसंघातून बविआ केवळ २ लाख ५४ हजार मते मिळू शकली.नालासोपारा, बोईसर आणि वसईतून आघाडी घ्यायची तसेच पालघर, डहाणू, विक्रमगड मधून अतिरिक्त मते मिळवून विजयाची गणिते जुळविण्यची रणनिती होती. मात्र बालेकिल्ला असेलल्या तीन मतदारसंघात आघाडी मिळू शकली नाही.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना सवाल
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?

हेही वाचा >>>डॉ हेमंत सावरा यांना ५ विधानसभा मतदारसंघात आघाडी; नालासोपार्‍यामधील सर्वाधिक आघाडी विजयात ठरली महत्वपूर्ण

२०१९ च्या तुलनेत मतं घटली

बहुजन विकास आघाडीला केवळ २ लाख ५४ हजार मते मिळाली आहे.  २०१९ च्या निवडणूकीत बविआला ४ लाख ४९ हजार मते मिळाली होती. यंदा ती मते निम्म्याने कमी झाली आहेत.

विरोधकांच्या अपप्रचाराचा फटका

महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बविआला लक्ष्य केले होते. महाविकास आघाडीने तर बविआला मत म्हणजे भाजपाला मत असा प्रचार सुरू केला होता. तो खोडून काढण्यात बविआला यश आले नाही. त्याचा फटका बसल्याचे बविआच्या नेत्यांनी सांगितले. केंद्रांची निवडणूक असल्याने एक खासदार काय करणार? असे भाजपाने सतत बिंबवले होते. वसईतील ख्रिस्ती, मुस्लिम, दलित तसेच इतर सर्व समाजातील मते ही बविआची ताकद. परंतु ख्रिस्ती, दलित, मुस्लिम ही बविआची पारंपरिक मते महाविकास आघाडीकडे वळल्याने बविआच्या विजयाचे गणित फसल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader