लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : बहुजन विकास आघाडी पक्षाचे नेते तसेच माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राऊत यांच्या मनवेल पाडा येथील घराखाली ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत राऊत (५४) हे बहुजन विकास आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत. ते विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील पाम टॉवर इमारतीत राहतात. शुक्रवार रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते रमाकांत उर्फ सोन्या पाटील यांनी राऊत यांना फोन करून बोलण्यासाठी खाली बोलावले. राऊत खाली गेले असता तेथे २० ते २५ लोकांचा जमाव हा होता. त्यांनी अचानक प्रशांत राऊत मारहाण करण्यात सुरुवात केली. राऊत यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाचा स्वप्निल पाटील (३६) हा मध्ये पडला मात्र त्याला देखील मारहाण करण्यात आली.

आणखी वाचा-निवृत्त’ हितेंद्र ठाकूर पुन्हा लढणार?

या मारहाणीत राऊत यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी रमाकांत पाटील, इम्तियाज शेख तसेच अन्य २० ते २५ जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रमाकांत पाटील हे माजी नगरसेविकेचे पती आहेत. मारहाण करणारे माझ्याच पक्षातील कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी मारहाण का केली की ते मला समजले नाही असे प्रशांत राऊत यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahujan vikas aghadi leader prashant raut beaten mrj
Show comments