बहुजन विकास आघाडीचे पानिपत तिन्ही उमेदवार पराभूत, ठाकूरांचे साम्राज्य खालसा

बहुजन विकास आघाडीच्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभेच्या जागांवर त्यांच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे.

Bahujan Vikas Aghadi wiped out in vasai nalasopara boisar assembly election 2024, bastions of Thakur collapsed
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे तीनही उमेदवार पराभूत झाले

वसई : वसई विरारच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून दबदाबा असलेले आणि एकहाती सत्ता असणार्‍या बहुजन विकास आघाडीचे पानिपत झाले आहे. पक्षाच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे. नालासोपारा मतदारसंघातून ३ वेळा आमदार असलेले क्षितिज ठाकूर यांचा भाजपच्या राजन नाईक यांनी पराभव केला. तर आयुष्यात एकही निवडणूक न लढवलेल्या भाजपाच्या स्नेहा दुबे पंडित यांनी बलाढ्या ठाकूरांचा पराभव केला. बोईसरची जागेवर देखील विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा शिंदे गटाच्या विलास तरे यांनी पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९९० पासून वसई विरारच्या राजकारणावर आपले वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीला प्रथमच मोठा धक्का बसला आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभेच्या जागांवर त्यांच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. नालासोपाऱ्यात भाजपच्या राजन नाईक यांनी क्षिजित ठाकूर यांचा सुमारे ३७ हजार मतांनी पराभव केला. बोईसर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास तरे यांनी विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा तब्बल४४ हजार ५५५ मतांनी पराभव केला. सर्वात धक्कादायक पराभव बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा होता. राजकारणात नवख्या असलेल्या भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडित यांनी अवघ्या ३ हजार २७५ मतांनी ठाकूर यांचा पराभव केला. हितेंद्र ठाकूर यांनी ६ वेळा निवडणूक लढवली होती आणि प्रत्येक वेळी जिंकले होते. त्यांचा प्रथमच पराभव झाला. ठाकूर पिता पुत्रांचा पराभव करून भाजपचे राजन नाईक आणि स्नेहा दुबे पंडित या जायंट किलर ठरल्या आहेत.

हेही वाचा…वसईत मतमोजणी साठी प्रशासन सज्ज, ३५४ मतपेट्यांची मोजणी; २५ फेऱ्यात निकाल स्पष्ट

या पराभवामुळे बविआच्या साम्राज्याला सुरूंग लागला आहे. पराभवानंतर बविआचे नालासोपारा येथील मध्मवर्ती कार्यालय ओस पडले होते. हा पराभव अनाकलनीय आहे, काही बोलण्यासारखं नाही अशी हताश प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bahujan vikas aghadi wiped out in vasai nalasopara boisar assembly election 2024 bastions of thakur collapsed sud 02

First published on: 23-11-2024 at 19:13 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा