वसई: बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. रविवारी ते अधिकृतपणे भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीने देखील आपल्या फलकांवरून राजीव पाटील यांचे छायाचित्रे हटवण्यात सुरवात केली आहे.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी त्यांचे आत्येबंधू राजीव पाटील हे पक्षात दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात. ते पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. ते वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर होते. मात्र राजीव पाटील यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ( या संदर्भातील वृत्त सर्वप्रथम शनिवारी लोकसत्ताला सांगितले होते.) भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी मिळवून नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या. याशिवाय शहरात नागरिकांना शुभेच्छा देणारे वैयक्तिक फलक लावले होते. मी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजीव पाटील यांनी लोकसत्ताला रविवारी सांगितले. रविवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात राजीव पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम

हेही वाचा >>>भाईंदर : नया नगर पोलीस ठाण्याबाहेर रक्तरंजित थरार; भररस्त्यात महिलेची पतीकडून हत्या

बविआने राजीव पाटील यांचे नाव वगळले

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी राजीव पाटील यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेवर मौन बाळगले होते. कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र आता राजीव पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न बहुजन विकास आघाडीने सोडून दिले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाच्या फलकांवरून राजीव पाटील यांचे नाव आणि छायाचित्रे वगळण्यात आले आहे. राजीव पाटील यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेमुळे वसई विरारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.