भाईंदर : सांडपाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरात ही घटना घडली.
हेही वाचा – मिरा रोड गोळीबार प्रकरणाचा छडा; व्यावासायिक वादातून भावा-बहिणींनी केली हत्या
हेही वाचा – नालासोपाऱ्यात परिवहन सेवेच्या भंगार बसला आग, तिसऱ्यांदा आग दुर्घटना
भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरात नक्षत्र ही रहिवाशी इमारत आहे. या इमारतीच्या सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी सोमवारी दुपारी गणेश उत्तम आवटे ( ३५) आणि महेंद्र पोंडकर (४७) असे दोन कामगार बोलावण्यात आले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास ते टाकीत उतरले होते. मात्र टाकीतील विषारी वायूमुळे दोघांचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले. यात महेंद्र पोंडकर या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला. गणेश आवटे या मजुराला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. कुठल्याही सुरक्षेच्या साधनाशिवाय ते टाकीत उतरले होते. याप्रकरणी सध्या अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली.