भाईंदर :- माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर प्रसारीत केल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांच्या छायाचित्रकारावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोमवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र पोलिसांनी सूडबुद्धीने आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा आरोप करत जैन यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले.
आमदार गीता जैन यांच्याकडे छायाचित्रकार म्हणून काम करत असलेल्या हर्ष शाह नावाच्या तरुणाने ‘माय मिरा भाईंदर’ या फेसबुक पेजवर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला होता. याबाबत नरेंद्र मेहता यांनी तक्रार दिल्यानंतर हर्षवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी नवघर पोलिसांनी हर्ष शाह याला चौकशीसाठी घरातून ताब्यात घेतले. मात्र ही कारवाई सुडबुद्धीची असून पोलिसांनी बेकायदेशीररित्या हर्ष याला ताब्यात घेतल्याचा आरोप आमदार गीता जैन यांनी केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी गीता जैन यांनी नवघर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. आपल्या कर्मचारी व कार्यकर्त्यांना सातत्याने खोट्या गुन्हात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप जैन यांनी केला.
हेही वाचा – मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
हर्ष शाह याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून चौकशी करण्यासाठी त्याला नियमानुसार ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.