भाईंदर : जागेच्या तसेच प्रांतिक वादात सापडलेल्या मिरा भाईंदर शहरातील उत्तर भारतीय भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी पार पडला. या भवनाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे.

मिरा भाईंदर शहरात जैन मतदारांबरोबरच उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी स्वखर्चाने ‘गंगोत्री उत्तर भारतीय भवन’ उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारी (१७ सप्टेंबर) या भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रसिद्ध कथाकर राम भट्टाचार्य महाराज यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उत्तर भारतीय समाजाचे प्रमुख नेते व आमदार गीता जैन समर्थक उपस्थितीत होते.

Gang rape with married woman at knife point
नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
knife attack on bjp office bearer in mira bhayandar over financial disputes
मिरा भाईंदर मध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक चाकू हल्ला; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

हेही वाचा – वसई-विरारमधील पशुवैद्याकीय रुग्णालयाला विलंब

मात्र शहरात यापूर्वीच आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने महापालिकेमार्फत हिंदी भाषिक भवन उभारले जात आहे. त्यात आता आमदार गीता जैन देखील दुसरे ‘उत्तर भारतीय भवन उभारत असल्याने यावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. शहरात किंबहुना राज्यात एकही मराठी भाषिक भवन नसताना त्याकडे दुर्लक्ष करून थेट परप्रांतीयांसाठी भवन का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. तसेच यामुळे प्रांतिक वाद पेटणार असल्यामुळे या विरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

जागेचा देखील वाद

मिरा रोड येथील युनिक ओरम जवळ सर्व्हे क्रमांक ४४६ (जुना) जागेवर हे भवन उभारले जात आहे. मात्र यावर विकासक नरेश शाह यांनी आक्षेप नोंदवला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना पत्र दिले असून सदर जागेवर शासन नियमानुसार पैसे भरून विविध प्रकरच्या परवानग्या घेतल्या असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या भवनाला बांधकाम परवानगी देऊ नये, अशी विनंती त्यांनी पत्रात केली. याशिवाय याच जागेच्या वादाबाबत २०२० साली आमदार प्रताप सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच जागेवर बेकायदेशीररित्या ताबा घेतल्याबाबत जैन यांच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला होता.