भाईंदर- भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याविरोधात एका महिलेला अश्लील शिविगाळ आणि धमकावल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी उत्तन येथे ही घटना घडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना समर्थन दिले होते. या निवडणुकीत ते म्हस्के यांचा प्रचार करत होते. २० मे रोजी मतदानाच्या दिवशी ते ‘म्हस्के यांना विजयी करा’, ‘धनुष्यबाणाला मत द्या’ असे सांगत फिरत होते. सकाळी ते उत्तनच्या भाटेबंदर येथील लाईट हाऊस परिसरात आपल्या सहकार्‍यांसमवेत होते. त्यावेळी त्यांनी तेथील बुथवरील मुलांना धनुष्यबाणाला मतदान करा, असे सांगितले. त्यामुळे तेथे असलेल्या ४२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे चित्रिकरण केले. ते पाहून संतापलेल्या मेंडोन्सा यांनी मला अश्लील शिविगाळ केली असा आरोप या महिलेने केला आहे.

हेही वाचा – वर्सोवा खाडी भूस्खलन दुर्घटना : दोन दिवसानंतरही चालक ढिगाऱ्याखाली, शोध कार्य सुरूच

या प्रकरणी फिर्यादी महिलेने उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आम्ही माजी आमदार मेंडोन्सा यांच्याविरोधात कलम ३५४ (अ), ३५२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली.

हेही वाचा – वसई : एचडी बीच रिसॉर्ट मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

फिर्यादी महिला ही पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होती. मात्र पक्षात पडलेल्या फुटीनंतर राजीनामा देऊन सामाजिक कार्य करत आहे. भाईंदरच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्प तसेच इतर स्थानिक मुद्द्यांवरून त्यांचा माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याबरोबर वाद होता.