भाईंदर :- मिरा भाईंदरमधील भाजप पक्षाच्या माजी नगरसेविकांचा गोव्यातील रिसॉर्टमधील नृत्याचा एक खासगी व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पेटले आहे. चुकीच्या पद्धतीने हा विडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या माजी नागरसेविकांनी शुक्रवारी नवघर पोलीस ठाण्यात घेराव घातला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरा भाईंदर शहराचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा रोड येथे प्रति पंढरपूर मंदिराची उभारणी करून भजन-कीर्तन सप्ताह आयोजित केला आहे. मात्र ते स्वतः येथे उपस्थित न राहता आपल्या समर्थक माजी नगरसेवक व नगरसेविकांना घेऊन गोव्यात पिकनिकसाठी गेले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. दरम्यान गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये या माजी नागरसेविकांचा नृत्य करतानाचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – विरार पोलिसांच्या धमकीमुळे आत्महत्या, १० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे मानवाधिकार आयोगाचे आदेश

मेहता यांच्या विरोधकांनी या व्हिडीओमध्ये चुकीचा मजकूर टाकून आमची बदनामी केल्याचा माजी नगरसेविकांचा आरोप आहे. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दहा माजी नगरसेविका आणि मेहता समर्थकांनी शुक्रवारी संध्याकाळी नवघर पोलीस ठाण्यात घेराव घातला होता.

हेही वाचा – रिक्षाचालकाकडून अल्पववयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शोधासाठी पोलिसांची पथके

या प्रकरणी कायदेशीर बाबीचा तपास करून गुन्हा दाखल करणार असल्याचे नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhayander former corporators video from goa goes viral a siege at the police station to demand action ssb
Show comments