वसई :विरार पूर्वेच्या शीरसाड अंबाडी मार्गावरील चांदीप येथे गणेशोत्सवासाठी कपडे खरेदी करून परतणाऱ्या दुचाकीस्वाराला टेम्पोची धडक लागून अपघात घडला आहे. यात बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.मानसी पाटील असे या मुलीचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमरास घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवा खरेदीसाठी लगबग सुरू आहे.मांडवी येथे राहणारे धनंजय पाटील आपल्या दुचाकीवरून दोन्ही मुलांना घेऊन उसगाव येथे कपडे खरेदीसाठी गेले होते.खरेदी करून घरी परतत असताना चांदीप जवळ पोहचताच भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पो ने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात धनंजय पाटील व त्याची दोन्ही मुलं  दूरवर फेकली गेली त्यावेळी मुलगी मानसी पाटील हिच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा ओमकार यास डोक्यात दुखापत झालेले आहे यावेळी टेम्पो चालक पळून गेला आहे. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.