लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई: वाहतूक पोलिसाने कागदपत्र मागितल्याने एका दुचाकीस्वाराने पोलिसालाच मारहाण केल्याची घटना वसईत घडली आहे. वालीव पोलीस या फरार दुचाकीस्वाराचा शोध घेत आहे.वसई विरार शहरात कर्तव्यावर असणार्‍या पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना शुक्रवारी घडली आहे. वसई पूर्वेच्या फादरवाडी जंक्शन येथे वाहतूक पोलीस निळंकठ धायतडक हे कार्यरत होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास ते वाहनांची तपासणी करत असताना एका दुचाकीस्वाराला (एमएच ०४ एसएस ९१७८) अडवले आणि कागदपत्रांची मागणी केली.

त्यावेळी दुचाकीस्वाराने निळकंठ यांना शिविगाळ केली आणि त्यांना मारहाण करून पळ काढला. पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वाराची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी शिवम कुमार नामक इसमाची आहे. दुचाकीवरून आरोपीची ओळख पटविण्यात येत आहे. घडलेला प्रकार गंभीर आहे. आमचे पोलीस नियमानुसार काम करत होते. मात्र आरोपीने पोलिसाला विनाकारण मारहण केली आहे, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी सांगितले. वालीव पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३५३, ५०४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.