एक किलोमीटर परिघातील १४00 कोंबडय़ांची विल्हेवाट

dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
gangster janglya satpute marathi news
पुणे: घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त
maharashtra recorded 29 percent more rainfall than average
Rainfall In Maharashtra : राज्यात २९ टक्के अधिक पाऊस; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत किती पाऊस पडला
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
Pavana dam is 100 percent full
पिंपरी : शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली, पवना धरण भरले शंभर टक्के
Yeola, potholes, Nashik, Yeola potholes,
नाशिक : खड्ड्यांमुळे येवलेकर त्रस्त
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

विरार : शुक्रवारी विरारच्या अर्नाळा-आगाशी भागातील कोंबडय़ांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे उघड होताच जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शनिवारी या परिसरात शोधमोहीम रावबून एक किलोमीटर परिघातील १४०० कोंबडय़ा नष्ट केल्या.

वसईत बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे त्याचा फैलाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. 

गेल्या आठवडय़ापासून विरारमधील अर्नाळा, आगाशी, बोळिंज परिसरातील काही भागांत अचानक कोंबडय़ांचा मृत्यू झाला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबडय़ाचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवले असता कोंबडय़ांचा बर्ड फ्लूने मृत्यू   झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे शनिवारी अर्नाळा आणि आगाशी परिसरात जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पुणे वैद्यकीय शाळेचे अधिकाऱ्यांचे पथक आणि अर्नाळा ग्रामपंचायतीने ही शोधमोहीम राबवली.

बर्ड फ्लूची लागण झालेल्या एक किलोमीटर परिघातील कुक्कुटपालन केंद्रांतून १४०० कोंबडय़ा ताब्यात घेऊन त्यांची पुरापाडा येथील डंपिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.