भाईंदर :-ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार उभा राहिल्यास त्यासाठी काम करण्यात मिरा भाईंदरच्या भाजप पक्षाने सक्त नकार दिला आहे.या संदर्भात पक्ष कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठवून तसेच प्रत्यक्ष भेटून याबाबतची नाराजी जाहीर केली आहे.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे लोकसभेची जागा ही कळीचा मुद्दा ठरू लागली आहे. सध्या या लोकसभेचे नेतृत्व ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते राजन विचारे हे करत आहेत. यावरून आगामी निवडणुकीला ही जागा शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या पदरात पाडावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.शिवाय मुख्यमंत्र्यांचा कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ  देखील याच क्षेत्रात आहे.त्यामुळे  महायुतीतील वाटाघाटीनंतर ही जागा शिंदे गटाच्या हाती जाणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट होऊ लागले आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

हेही वाचा >>> इक्बालसिंग चहलांना आयुक्तपदावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट; म्हणाले, “प्रत्येक घोटाळ्याची…”

मात्र ही जागा शिवसेनेच्या हाती देण्यास आता भाजपच्या स्थानिक पातळीवरून विरोध केला जात आहे.यात मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेसाठी प्रचार करण्यास भाजप कार्यकर्त्यांनी थेट नकार दिला आहे. मिरा भाईंदर शहरात शिवसेनेचे अस्तित्व फार कमी आहे.शिवाय आजवर शिवसेनेमधून निवडणून आलेल्या राजकीय पुढऱ्यांने येथील भाजपला कमजोर करण्यासाठीच काम केले आहे. त्यामुळे भविष्यात देखील शिवसेनेचा उमेदवार येथून निवडून आल्यास याचा भाजप संघटनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मराठवाड्यात मुस्लिम व मराठा मतपेढीला आकार

म्हणून शहरात भाजप मधील नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन  शिवसेनेसाठी काम न करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.याबाबत त्यांनी पत्र देऊन देवेंद्र फडणवीसांकडे  जागा न सोडण्याची विनंती देखील केली आहे.त्यामुळे उमेदवाराची घोषणा होई पर्यंत  पक्षश्रेष्ठी काय  निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

“मिरा भाईंदर मध्ये भाजप मजबुतीने काम करत आहे.पक्षाचे संघटन आणि काम पाहता या क्षेत्राचे नेतृत्व करणारी जागा भाजपलाच भेटावी, अशी सर्वच कार्यकर्त्याची इच्छा आहे.त्यामुळे पक्षाच्या उमदेवारासाठी आम्ही काम करू तर अन्य कोणासाठी काम करण्यास आम्ही तयार नसल्याचे मत वरिष्ठांना कळविले आहे.” नरेंद्र मेहता – भाजप माजी आमदार ( मिरा भाईंदर )