लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर एका कुटुंबाने चक्क उकळते पाणी फेकल्याची घटना बुधवारी संध्याकाळी भाईंदर येथे घडली. या घटनेत ४ पोलिसांसह एक पंच होरपळे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाईंदर पश्चिमेच्या गीता नगर येथील वालचंद प्लाझा इमारतीमध्ये चौबे कुटुंबियांनी प्रतिभा तांबडे यांची सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. मात्र चौबे कुटुंबीय ती सदनिका खाली करत नसल्याने घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होता. या संदर्भात तक्रार आल्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंनत गायकवाड, पोलीस हवालदार दीपक इथापे,किरण पवार, शिपाई रवी वाघ, शिपाई सलमान पटवे आणि पंच विजय सोनी गेले होते.
यावेळी चौबे कुटुंबीयाने अचानकपणे दरवाजा उघडून उकळते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले. यात ५ जण भाजले आहेत. या पोलिसांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी अजय चौबे आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली आहे, अशी माहिती परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd