लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई: आई ओरडल्यामुळे रागावलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने तलावात उडी मारून आत्महत्या केली. सोहम चक्रवर्ती असे या मुलाचे नाव आहे.

सोहम चक्रवर्ती (१६) हा विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथील रामविला अपार्टमेंट मध्ये रहात होता. तो वसईतील एका महाविद्यालयात ११ वी वाणिज्य शाखेत शिकत होता. सोमवारी तो क्लासला गेला नव्हता. त्याने क्लास बुडविल्याचे समजल्यावर त्याची आई त्याला ओरडली होती. त्यामुळे रागावून तो घराबाहेर निघून गेला होता. तो घरी न आल्याने त्याच्या पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तो अल्पवयीन असल्याने विरार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

आणखी वाचा-विरारमध्ये अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या

दरम्यान, त्याचा शोध सुरू असताना विरार पूर्वेच्या साईदत्त नगर येथील खदाणीच्या तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने रागाच्या भरात तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. या प्रकऱणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोहम हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.