वसई: विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथे खेळताना थेट रस्त्याच्या मध्ये पळत सुटलेला चिमुकल्या मुलाचा दुचाकीची धडक बसून अपघात घडला आहे. शनिवारी सकाळी नऊच्या  सुमारास ही घटना घडली. या अपघातात चिमुकल्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा >>> विसर्जन मिरवणूक पहायला गेलेल्या महिलेचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

अर्नाळा कोळीवाडा येथे लहान मुलांचा गट खेळत होते. अचानकपणे ही मुले रस्त्यावर पळत  यावेळी रस्त्यावरून भर वेगात असलेल्या एका स्कूटरला  एका मुलाची धडक बसली  व विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका रिक्षाखाली तो फेकला गेला. जॉरेट जेम्स कोळी (८) असे या अपघात घडलेल्या मुलाचे नाव आहे. ही सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून यात या लहान मुलाला किरकोळ मार लागला आहे. त्याची प्रकृती  स्थिर आहे असे येथील नागरिकांमधून सांगण्यात येत आहेत.या घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे लहान मुले खेळताना त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय वाहन चालकांनी सुद्धा वाहने सावकाश चालवावी अशी  प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader