मीरा रोड येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीत मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देणार असल्याची जाहिरात करणाऱ्या ‘त्या’ गृह निर्माण गृहनिर्माण संस्थेने  अखेर आपली जाहिरात मागे घेतली आहे. याबाबत मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विकासकाने माफी मागितली आहे.

हेही वाचा >>> माजी स्थायी समिती सभापतीकडे मागितली १ कोटींची खंडणी;विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मराठी नागरिकांना घर नाकरण्यात येत असल्याचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मीरा रोड येथील एका विकासकाने देखील केवळ मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली होती. यामुळे खळबळ उडाली होती. महाराष्ट्रात मराठी नागरिकांना घर देण्यास नकार देणाऱ्या विकासाबद्दल  मीरा भाईंदर मनसे नेते संदीप कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे या संदर्भात नमती भूमिका घेत गृहनिर्माण  संस्थेने ही जाहिरात मागे घेत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या नावे  लेखी माफी नामा लिहुन दिला आहे. या प्रकल्पाशी आमदार गीता जैन यांचे नाव जोडण्यात आले होते. याबाबत  त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती

Story img Loader