विरार :  नालासोपारा येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना समोर आली आहे. यात ३५ हून अधीक लोक अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या मदतीने सुरू आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहीती पालिकने दिली आहे. सदर घटनेवने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा पुर्वेच्या तुळींज परिसरातील साई निवास या एक मजली चाळीचा रविवारी सकाळी १० च्या सुमारात बालकनीचा भाग अचानक कोसळून खाली आला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २१ सदनिका तर तळ मजल्यावर १० सदनिका आहेत. रविवार असल्याने बहुतांश नागरिक घरात असल्याने दारासमोर स्लॅब कोसळल्याने घरातच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

या बाबत माहिती देताना पालिकेच्या सहाय आयुक्त विशाखा मोटघरे यांनी माहिती दिली की, सदर घटनेत कुणीही जखमी झाले नाही. सर्व रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सदरची इमारत धोकादायक इमारत घोषित केली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर रहिवाशांनी सहरची इमारत ही २५ वर्षे जुनी असल्याची माहिती दिली. यामुळे ही इमारत धोकादायक असतानाही पालिकेच्या यादीत याची कोणतीही नोंद नसल्याने शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building collapse in nalasopara vasai virar fire brigade trying to rescue 35 people prd