वसई: वसई विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी रविवारी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले. पक्षाचे नेते राजीव पाटील यांनी केलेलं बंड शमल्यानंतर रविवारी बहुजन विकास आघाडीचा पहिला कार्यकर्ता मेळावा विरार मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी वसईतुन लढावे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. राजीव पाटील यांनी बंड केले नव्हते ते त्या विरोधक आणि माध्यमांनी वावडया उठवल्या होत्या, असेही ठाकूर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वसई विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस शिवसेनेत वाद; शिवसेना पदाधिकार्‍यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचा मेळावा रविवारी विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात संपूर्ण वसई विरार आणि पालघर जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. २०१९ ची निवडणूक जिंकल्या नंतर हितेद्र ठाकूर यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यानी केली. ठाकूर यांचे भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर वसईतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘वसईचा आमदार मीच असणार’ असे त्यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हेही वाचा >>> आईने घातलेल्या भावनिक सादेमुळे माघार; निवडणूक लढवणार नाही – राजीव पाटील

वसई, नालासोपारा आणि बोईसर या ३ जागांबरोबर पालघर जिल्ह्यातही उमेदवार उभे करून जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजीव पाटील यांचे बंड ही अफवा- ठाकूर

शनिवारी राजीव पाटील यांनी माघार घेतल्यानंतर बंड शमले होते. यामुळे पक्षात चैतन्य पसरले होते. रविवारी होणाऱ्या मेळाव्यात राजीव पाटील उपस्थित राहतील का याबाबत सर्वाना उत्सुकता होती. मात्र राजीव पाटील या मेळाव्याला अनुपस्थित राहिते. याबाबत ठाकूर यांना विचारले असता ते कामानिमित्त मुंबईत गेले असल्याने येऊ शकले नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.. राजीव पाटील यांनी बंड केले नव्हते. माध्यमांनी त्या वावड्या उठवला होत्या. स्वतः राजीव पाटील यांनी एकही वक्तव्य केले नव्हते. मी किंवा  आमच्या पक्षाच्या अन्य नेत्यांनी यावर कधी भाष्य केले नव्हते, असे ठाकूर यांनी सांगितले. आम्ही एकत्र आहोत आणि यापुढे देखील एकत्र काम करू असेही ठाकूर म्हणाले. माध्यमे राजीव पाटील यांच्या प्रवेशाच्या तारखा जाहीर करत होते, असेही ते म्हणाले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bva chief leader hitendra thakur announced to contest assembly election from vasai constituency zws