लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

विरार: प्रियकराला अश्लील छायाचित्रे पाठवणे धोकादायक ठरू शकतं याचा प्रत्यय विरार मधील २० वर्षीय तरुणीला आला आहे. या तरुणीच्या मित्राचा मोबाईल हॅक करून खासगी छायाचित्रे वायरल करण्यात आली आहेत तसेच तिच्याकडून ८ हजारांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार मध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने विरार पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. या काळात तिने प्रियकारसोबतच काही खासगी छायाचित्रे काढली होती. तसेच काही अनावृत्त छायाचित्रे (न्यूड सेल्फी) प्रियकराला पाठवली होती. मात्र एका अज्ञात इन्साटग्राम आयडीवरून या तरुणीची ही अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनमी करण्यात आली. ही सर्व छायाचित्रे आणखी वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून ८ हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकऱणी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आमचे मोबाईल फोन हॅक करून ही छायाचित्रे घेण्यात आल्याचे पीडित तरुणीने पोलिसांनी सांगितले. त्यानुसार अज्ञात इन्स्टाग्राम आयडी धारकाच्या विरोधात कलम ३५४, ३५४(अ), ३८४, ५०६, सह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलन ६७, ६७ (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा-विरार: आई ओरडल्याने मुलाची तलावात उडी मारून आत्महत्या

फिर्यादीच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने तिच्या मित्राचा मोबाईल हॅक करून ही खासजी छायाचित्रे काढून ती वायरल केली आहे. या प्रकरणी आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत अशी माहिती विरार पोलीस ठाण्याच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके यांनी दिली.

Story img Loader