वसई: मध्य रेल्वेच्या वसई दिवा रेल्वे मार्गावर बाडमेर-यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने या रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. जवळपास तीन तासांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने दिव्यावरून वसईच्या दिशेने येणाऱ्या लोकल खोळंबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – स्थलांतरीत पक्ष्यांची जिल्ह्याकडे यंदाही पाठ, डोंबिवलीतील मुख्य ठिकाणी मोजक्याच पक्ष्यांची नोंद, वसईत १२८ प्रजातींची निरीक्षकांडून नोंद

हेही वाचा – वसई: नायगावमध्ये कार-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालक जागीच ठार, तर दोन प्रवासी व कारचालक जखमी

वसई विरारमधील बहुतांश नागरिक हे मध्यरेल्वेवर धावणाऱ्या वसई-दिवा-पनवेल या मार्गावरून प्रवास करतात. तर दुसरीकडे जूचंद्र, कामण, खारबाव, भिवंडी या स्थानकातून अनेक ग्रामीण भागातील नागरिक या गाडीने आपला छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी शहरी भागाकडे येत असतात. शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेच्या वसई दिवा रेल्वे मार्गावर बाडमेर यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे यामार्गावर गाडी थांबवण्यात आली असे रेल्वेने सांगितले. गाडी थांबून राहिल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. याचा परिणाम नेहमीप्रमाणे धावणाऱ्या वसई – दिवा लोकल सेवेवरही झाला. दिव्यावरून वसईकडे येणाऱ्या गाड्या खोळंबल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सेवा पूर्ववत होत नसल्याने काही प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी प्रवास सुरु केला होता. जवळपास तीन तासांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे.