वसई : नयना महंत या तरुणीच्या हत्या प्रकरणात नायगाव पोलिसांनी वसई सत्र न्यायालयात ६२२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तिचा प्रियकर मनोहर शुक्ला आणि त्याची पत्नी पूर्णिमा या प्रकरणातील आरोपी आहेत. या दोषारोपपत्रात २५ जणांचे जबाब असून मृतदेहाजवळली मोहरीचे रोप आणि ज्या बादलीत तिला बुडवले ते पाणी महत्वाचे पुरावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिनेमात केशभूषाकार म्हणून काम करणारी नयना महंत (२८) या तरुणीची तिचा प्रियकर मनोहर शुक्ला याने ९ सप्टेंबर रोजी हत्या केली होती. यानंतर पत्नी पूर्णिमा शुक्ला हिच्या मदतीने नयनाचा मृतदेह गुजराथच्या वलसाड येथे नेऊन टाकला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी शुक्ला दांपत्याला अटक केली होती. नायगाव पोलिसांनी याप्रकरणाचा तपास पूर्ण करून ६२२ पानांचे दोषारोपपत्र वसईच्या सत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यात एकूण २५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. नयनाना मृतदेह बॅग मध्ये भरून शुक्ला दांपत्याने स्कूटरवरून वलासाडला नेला होता. ती बॅग लिफ्ट मधून खाली आणली होती. ते पाहणार्‍या सुरक्षा रक्षकाचा जबाबाचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा… लोकसत्ता ‘इम्पॅक्ट’ : वसईतील शहरी शेतकर्‍यांची उपेक्षा संपली, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळायला सुरवात

मोहरी आणि बादलीतले पाणी महत्वाचे पुरावे

९ सप्टेंबर रोजी मनोहर शुक्ला याने नयना महंतची हत्या केली होती. भांडण केल्यानंतर तिचे तोंड त्याने पाण्याच्या बादलीत बुडवले होते. वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्या फुफ्फुसात पाणी आढळले होते. ज्या बादतील त्याने नयनाचे तोंड बुडवले होते ते पाणी जप्त केले आहे. रासायनिक तपासणीत ते पाणी एकच असल्याचे सिध्द झाले आहे. याशिवाय नयनाच्या मृतहेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी सुटकेस मध्ये दिड किलो मोहरीच्या बिया टाकल्या होत्या. गुजराथ राज्याच्या वलसाड जवळील पार्डी येथील पार नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी हा मृतदेह टाकला तर सुटकेस दुर फेकली. मोहरीच्या बियांमुळे मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी येणार नाही असे त्यांना वाटले होते. त्या मोहरीच्या बिया घटनास्थळी रुजल्या आणि त्यांची रोपे उगवली होती. मोहरीच्या बियांचे रोपटे हा देखील पुरावा असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. आरोपींनी टाकलेली सुटकेस काही मुलांना मिळाली होती. त्यात मोहरीच्या बिया होत्या. पोलिसांना जरी सुटकेस मिळाली नसली तरी मोहरीच्या बिया असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांचा देखील जबाब दोषारोपत्रात जोडण्यात आला आहे. ज्या दुकानातून आरोपींनी मोहरीच्या दीड किलो बिया विकत घेतल्या त्या विक्रेत्याचा जबाब घेऊन तो जोडण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांना भक्कम पुरावे मिळाले आहेत. मोहरी आणि ज्या बादतील तिला बुडवले ते पाणी महत्वाचे ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा… वसई : अभिनेत्रीचे ‘न्यूड व्हिडीओ’ केले व्हायरल; अनेक तरुणींना अशाप्रकारे जाळ्यात ओढल्याची शक्यता

…म्हणून केली हत्या

मनोहऱ शुक्ला याचे नयना महंत बरोबर प्रेमसंबंध होते. मात्र त्याने तिला फसवून पूर्णिमा बरोबर लग्न केले. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते. मनोहरने फसवणुक केल्याने नयनाने त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घ्यावी म्हणून मनोहर तिच्यावर दबाव टाकत होता. त्यामुळे त्यांची भांडणे व्हायची. त्याला कंटाळून मनोहरने तिची हत्या केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charge sheet of 622 pages file in naina mahant murder case bucket water and mustard plants are important evidences asj