लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईंदर : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच मैत्रिणीला फसवणाऱ्या एका तरुणीला काशिगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणीने मुलाचा आवाज काढून फिर्यादी तरुणीला लाखो रुपये उकळले होते.

मिरा रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या एनी दरमणी हिची याच इमारतीमध्ये भाडयाने राहण्यास आलेल्या रश्मी कर नामक तरुणीशी मैत्री झाली होती. दोन-तीन महिन्याच्या मैत्रीनंतर रश्मीने एनीला आपल्या मित्राच्या कार्यालयात चांगल्या पगारावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी तिचा बायोडाटा व इतर कागदापत्रे घेतले.

आणखी वाचा-माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या छायाचित्रामुळे खळबळ, ८ वी उत्तीर्ण असूनही पदवीधर मतदार संघात मतदान कसे?

काही दिवसांनी एनीला अभिमन्यू मेहरा नामक तरुणाचा फोन आला. एनीला नोकरी देणार असल्याचे त्या तरुणाने सांगितले. मात्र नंतर नोकरी ऐवजी व्यवसायामध्येच भागीदारी देऊ केली. या साठी एनीने ६ लाख ६० रुपये हे अभिमन्यूला ऑनलाइन पाठवले. दरम्यान एनी अभिमन्यूकडे मागणी करू लागली. मात्र भेटण्यास सातत्याने नकार मिळू लागल्यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला. याबाबतची तिने काशिगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत लोंढे यांनी तांत्रिक दुष्ट्या सखोल तपास सुरु केला असता येणारा दूरध्वनी हा रश्मीकडून येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रश्मीची कसून चौकशी केल्यानंतर हा दूरध्वनी ती स्वतः करत असल्याचे तिने मान्य केले. त्यामुळे तीच्या विरोधात फसवणूक व इतर अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-वसई: जमावाच्या मारहाणीत मोबाईल चोराचा मृत्यू

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

दूरध्वनीवर मुलाचा हुबेहूब आवाज काढण्यासाठी आरोपी रश्मीने कुत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विकसित मोबाईल ॲपचा वापर केला असल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय आपल्यावर संशय येऊ नये म्हणून दूरध्वनी करण्यासाठी बोगस सिमकार्डचा वापर केल्याची माहिती तपास अधिकारी अभिजीत लोंढे यांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating with girl friend by boys voice use of artificial intelligence technology mrj