वसई – आपल्या स्वत:च्या ३ मुलींवर बलात्कार, २ मुलींचा लैंगिक छळ आणि पत्नीला मारहाण करणार्‍या पित्याला मध्यवर्ती गुन्हे शाखेने सिंधुदुर्गातून अटक केली आहे. आरोपी हा कुख्यात छोटा राजन टोळीचा शार्प शूटर आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे १३ गंभीर गुन्हे दाखल आहे. ७ वर्ष तो आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. या मुली भरोसा कक्षाच्या संपर्कात आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी ५६ वर्षीय असून तो कुख्यात गुन्हेगार आहे. तो कोकणाताली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहतो. त्याला ५ मुली आहेत. आरोपी हा २०१८ पासून स्वत:च्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. २१ वर्षीय मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे ती ५ वेळा गर्भवती राहिली होती. आरोपीने तिचा गर्भपात घडवून आणला. १० आणि १२ वर्षांच्या मुलींना अश्लील चित्रफिती दाखवून त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार केले होते. त्याने पत्नी आणि मुलींना प्रचंड धाकात ठेवले होते. पत्नीला देखील बेदम मारहाण केली होती. या अत्याचारामुळे तिने आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता. वडिलांच्या अत्याचारा कंटाळून २२ वर्षांची मुलगी नालासोपारा येथे राहणार्‍या मावशीकडे आली.

भरोसा कक्षामुळे वाचा फुटली

मुली वडिलांच्या अत्याचारामुळे दहशतीखाली होत्या. त्यांना गुन्हे शाखेच्या भाईंदर येथील भरोसा कक्षाची माहिती मिळाली. त्यानुसार मावशी मुलींना घेऊन भरोसा कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्याकडे गेल्या. शिंदे यांनी मुलींचे समुपदेशन केले आणि त्यांना धीर देत आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे मुली तक्रार देण्यासाठी तयार झाल्या आणि या भयंकर प्रकरणाला वाचा फुटली, असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी सांगितले.

आरोपी छोटा राजनचा साथीदार

याबाबत माहिती देताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सांगितले की, आरोपी हा कुख्यात डॉन छोटा राजन याचा शार्प शूटर आहे. त्याच्यावर हत्या, गोळीबार, खंडणी यासारखे १३ गुन्हे दाखल आहे. २०२०३ मध्ये नालासोपारा येथे झालेल्या रमेश पतंगे हत्या प्रकरणातील देखील तो आरोपी आहे. मुलींवर बलात्कार केल्याप्रकऱणी त्याच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात बलात्कार, धमकी देणे, मारहाण करणे, गर्भपात घडवून आणणे, आत्महत्येला प्रवृत्त कऱणे तसेच पोक्सोच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.