विरार : विरार मध्ये दांडिया खेळताना एका पस्तीस वर्षे तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयात नेण्यापूर्वीच निधन झाले. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीष जैन (३५) या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला.
त्याचे वडील नरपत जैन आणि भाऊ त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रिक्षामध्येच मनीष जैन याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन (६५) यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला…ज्या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जैन कुटुंबांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.