वसई : वसई विरार शहरात सर्वत्र नाताळ सणाच्या उत्साहाला सुरवात झाली आहे. या नाताळ सणाच्या निमित्ताने वसईत विविध ठिकाणी शोभयात्रा काढल्या जात आहेत.. यात पारंपारिक वेशभूषेत ख्रिस्ती बांधव सहभागी होत जल्लोष साजरा केला.

वसईत साजरा होणारा नाताळ सण हा केवळ धार्मिक सण म्हणून साजरा न होता.पर्यावरण प्रबोधन, संस्कृती संवर्धन, सामाजिक उपक्रम अशा विविध अंगाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे या सणाच्या निमित्ताने विविध ठिकाणच्या भागात शोभायात्रा काढल्या जातात. याच नाताळ याच पार्श्वभूमीवर नाताळची तयारी म्हणून वसईत उत्तर ख्रिसमस कार्निवल काढण्यात आले होते. शोभायात्रेत मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. नाताळ सणाचा देखावा, वसईतील पारंपारिक बँन्ड,ख्रिसमस कँरल, तीन राजे ,बाळ येशुचा पाठलाग करणारा राजा,हेरोद, उंट, टांगे, पारंपारीक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा करून अनेक जण यात सहभागी झाले होते.

stray dogs bit children and elderly people in vasai Nalasopara
वसई, नालासोपाऱ्यात भटक्या श्वानाचा ४२ जणांना चावा; नागरिक भयभीत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
decisions in GST Council’s 55th meeting
अग्रलेख: अब तक ५६!
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
Vasai Nalasopara Constituency, Vasai Nalasopara latest news, Vasai Nalasopara Constituency candidates,
वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
vasai municipal schools
शहरबात : छडी वाजे छम छम…
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?

हेही वाचा…वसई, नालासोपाऱ्यात भटक्या श्वानाचा ४२ जणांना चावा; नागरिक भयभीत

रविवार पासून ठिकठिकाणी शोभायात्रा निघत आहेतM उत्तर वसई, दक्षिण वसईच्या निर्मळ, वाघोली, नाळे, नानभाट, उमराळे, माणिकपूर, चुळणे अशा मार्गावरून नेण्यात आली. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. नाताळच्या पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधव पारंपारिक लोकनृत्याच्या गाण्यावर ठेका धरत एकमेकाला नाताळच्या शुभेच्छा देत मोठ्या जल्लोषात ख्रिसमस कार्निवल पार पडले. सध्या स्थितीतील निर्माण होत असलेल्या प्रश्नांवर समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न या कार्निवल मधून आम्ही सतत करत असतो असे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे.

नाताळचा हर्ष अणि आनंद देणाऱ्या विविध उपक्रमासोबतच जनजागृती, तथा सामाजिक प्रबोधनाचे देखावे आकर्षकरित्या या मिरवणूकीतून पाहायला मिळतात. या मिरवणूकीला लाभलेले सर्वधर्मीय स्वरूप आणि स्थानिय संस्कृती, परंपरा यांच्या संवर्धनाची जोड यामुळे ती आणखी वैशिष्ट्येपूर्ण होऊन सर्वच वसईकरांसाठी कुतूहल, तसेच औत्सुक्याचा भाग बनली आहे. वसईचा नाताळ म्हटल्यावर आधी त्याचे अनेकाविध वैशिष्ट्ये सांगितले जायचे. मात्र आता सर्वात अग्रभागी उंट, हत्ती आणि घोड्यांच्या सहभागाने भरविल्याजाणारा हा कार्निवल उपक्रम वसईत लक्षवेधी ठरतो.

हेही वाचा…वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय

सामाजिक सलोखा जपण्यासाठी कार्निवल

आपल्या एकमेकांच्या मधील मतभेद विसरुन यात सहभागी होण्यासाठीचे हे ख्रिसमस कार्निवल आहे. यंदाचा नाताळ हा जे लोक नैराश्यात गेले आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत व जे कष्टकरी अडचणीत आहेत, एकाकी आहेत त्यांना ऐक्याचा अनुभव यावा यासाठी आहे असे वसई धर्मप्रांताचे बिशप फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी सांगितले आहे. हा कार्निवल आपल्या श्रद्धेची साक्ष आहे असे सांगत त्यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

Story img Loader