वसई – वसई विरार महापालिकेतर्फे रविवारी एकाच वेळी ९७ ठिकाणी ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. समुद्रकिनारे, मंदिरे, औद्योगिक क्षेत्र आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून ५६ टन एवढा कचरा संकलीत करण्यात आला. ओला कचरा गोखिवर्‍याच्या कचरा भूमीत (डंपिंग ग्राऊंड) खतनिर्मिती करिता तर सुका कचरा पुर्नवापर व पुर्नचक्रीकरणाकरिता पाठविण्यात आलेला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत वसई विरार महापालिकेतर्फे वसई विरार शहरात ‘एक तारीख एक तास’ ही मोहीम राबविण्यात आली. एकूण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत ६४ शाळेतील ४ हजार ३३१ विद्यार्थी सहभागी झाले. तसेच १६ कॉलेजमधील ७९१ विद्यार्थी, ४२ स्वयंसेवी संस्थेचे १ हजार ६३४ सदस्य, १०७ बचत गटाचे १ हजार ७० सदस्य सहभागी झाले. तसेच पदाधिकारी, ज्येष्ठ नागरीक, इतर संघटनेचे सदस्य असे ९ हजार ६१२ सहभागी झाले होते. असे एकूण १७ हजार ४३८ जणांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेत एकूण २ लाक ३७ हजार ९९८ चौरस मीटर एवढा परिसर व ४०,३५३ मीटर एवढ्या लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. यात एकूण ५६ टन कचरा जमा झाला. जमा झालेल्या कचऱ्यातील ओला कचरा डंपिंग ग्राऊंड येथे खतनिर्मितीकरिता पाठविण्यात आला आहे व सुका कचरा पुनर्वापर व पुर्नचक्रीकरणाकरिता पाठविण्यात आलेला आहे.

pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized in Vasai, Mira Road,
वसई, मिरा रोडमध्ये ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त, एटीएम व्हॅनमध्ये संशयास्पद बेकायदेशीर रोकड

हेही वाचा – Video : विरार अर्नाळा येथे खेळताना रस्त्यावर पळत सुटलेल्या मुलाचा अपघात, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

अशी झाली स्वच्छता मोहीम

सकाळी ६.३० वाजतापासून ‘टुर दे वसई’ ही सायकल रॅली अमेय क्लब विरार (प) ते वसई किल्ल्यापर्यंत आयोजित करुन स्वच्छता मोहिमेत नागरिकांना सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये ३५० जणांनी सहभाग घेतला होता व संबंधितांकडून यावेळी वसई किल्ला येथे स्वच्छता करण्यात आली. राजोडी समुद्र किनार्‍यावर येथे तीन शाळांचे विद्यार्थी, महिला बचत गट व ज्येष्ठ नागरीक यांच्यासह समुद्र किनारी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यात ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पथनाट्ये आयोजित करुन स्वच्छतेचा संदेश व एकल प्लास्टिक वापर बंदीचा संदेश देण्यात आला. हिंदू- मुस्लिम एकता गट यांच्या मार्फत ६ ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच निळे गाव परिसरातील अयप्पा मंदिर व दर्गा परिसर तेथील हिंदु-मुस्लिम नागरीकांच्या सहभागातून स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेबरोबरच हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – वसई विरार शहरात एटीएम चोर सक्रीय; नायगाव मध्ये एटीएम केंद्र फोडून १० लाखांची रोकड लंपास

वालीव येथील गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशन मार्फतही इंडस्ट्रीयल परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे प्रभाग समिती एचमध्ये ज्येष्ठ नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे ५ रुग्णालये, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अग्निशमन केंद्र, उद्याने, तलाव इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत अमेय क्लासिक क्लब विरार, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, संत निरंकारी मंडळ ध्यास फाऊंडेशन, माऊली मित्र मंडळ, छत्रपती शाहू प्रतिष्ठान इत्यादी अशा अनेक संघटना संस्था सहभागी झाल्या होत्या. तसेच विविध प्रभाग समिती कार्यालयाअंतर्गत नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.