भाईंदर : शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी भाईंदरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनीधींसह राजकीय पक्षांच्या नेते उपस्थित राहणार आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेतर्फे मंगळवारी शहरात नाटय़गृहाचे लोकार्पण, नव्या पालिका मुख्यालयाचे आणि रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच चिमाजी अप्पा पुतळा अनावरण, महाराणा प्रताप स्मारक उद्घाटन अशा एकूण सहा कार्यक्रम होणार आहे. त्यानुसार कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले विवेक पंडित, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे आणि बाळाराम पाटील उपस्थितीत राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, स्थानिक आमदार गीता जैन आणि जिल्ह्यातील सर्व आजी -माजी आमदार आणि महापौरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मंचावर तब्बल २७ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader