जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी संमेलन १३ आणि १४ जानेवारी रोजी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमेलनाला हजेरी लावली यावेळी बोलत असताना त्यांनी मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन यावर आपली भूमिका मांडली. तसेच संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी त्यांच्या दाढीवर केलेल्या कवितेची आठवण करून दिली. तसेच दाढीवरूनच शिंदे यांनी लिहिलेल्या काही ओळी वाचून दाखविल्या. ज्यामुळे साहित्य संमेलनात एकच हशा पिकला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“दाढीवर फिरवित हात, त्यांनी केला संकल्प, ५० आमदारांचं पुर्नवसन, हाच यांचा प्रकल्प”, या रामदास फुटाणे यांच्या कवितेची आठवण मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात करून दिली. मग ५० आमदारांच्या पुर्नवसनबाबत सांगताना ते म्हणाले, “हे सर्व करायला धाडस, हिंमत, जिगर लागतं. ५० आमदार, १३ खासदार आणि लाखो कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात. तेव्हा तो विश्वासदेखील सार्थ ठरवावा लागतो. त्याची काळजी घ्यायला लागते. फक्त ‘मी आणि माझं कुटुंब’ एवढंच पाहून चालत नाही. तर संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे, असं मी मानतो.”

“पंतप्रधान गद्दारांच्या घराणेशाहीवर बोलले नाहीत”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

यानंतर एकनाथ शिंदे यांनीही काही ओळी वाचून दाखविल्या. ते म्हणाले, “ये है दाढी की किमया, दुष्टो का कर दिया सफाया.” त्यानंतर सभागृहात आणि मंचावर एकच हशा पिकला. यानंतर ते म्हणाले मराठीतही सांगतो, “या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे.”

“या साहित्य संमेलनाचा विषय शोध मराठी मनाचा आहे. त्यामुळे मी माझ्या मनाचे काही सागंत नाही. तर महाराष्ट्राच्या विकासाचे विचार सांगत आहे. बाळासाहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्यांचे हृदय विशाल होते. बाळासाहेब आणि दिघे यांच्या विचारानुसार समाजाचं जेवढं चांगलं करता येईल, तेवढं करणार”, असेही ते म्हणाले.

“२२ जानेवारीला देशात दिवाळी साजरी करा, पण…”, उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान, राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्यासाठी आमंत्रण

“राजकारणात हेवे-दावे असतात. पण हल्ली खूप खालच्या पातळीवर आरोप चालले आहेत. त्यामुळे रामदास फुटाणे यांनी आपल्या कवितेमधून त्यावर भाष्य करावे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. काही काही लोकांची सकाळी ९ वाजता कविता सुरू होते. त्यामुळे फुटाणे यांच्या कवितेची गरज आहे. समाजाला दिशा देण्याचे काम कवि, साहित्यिक, संत आणि किर्तनकारांनी केले आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनातूनही अशाच प्रकारचा संदेश जाईल”, अशीही अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

Story img Loader