वसई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान घाबरला असून सत्ता आल्यास पुढील ६ महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असा निर्धार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. शनिवारी दुपारी नालासोपारा येथे पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला उत्तर भारतीय नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘रामभक्त राज्य करेल की राष्ट्रद्रोही राज्य करेल’, याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे, असे सांगून योगी यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

पालघऱ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नालासोपारा येथील श्रीप्रस्थ मैदानात जाहीर सभा झाली. आपल्या भाषणात योगींनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करत असल्याचे सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित हातात असून आता पाकिस्तान देखील घाबरू लागला आहे, असे सांगितले.

Suvendu Adhikari Contai Cooperative Bank polls
Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेसकडून घरच्या मैदानावर धुव्वा, सुवेंदु अधिकारी यांच्या अडचणी वाढणार?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
dropped from cabinet by BJP is shocking for Ravindra Chavan
रवींद्र चव्हाण यांना भाजपचा धक्का?
Chhagan Bhujbal angry at not getting a ministerial position towards rebellion nashik news
‘फडणवीस यांच्या आग्रहानंतरही पक्षाकडून दुर्लक्ष’
Holkar chhatri pune
मंत्रिमंडळाचा विस्तार होताच पुण्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय
Union Home Minister Amit Shah is determined to make the country free from Naxalism within a year and a half print politics news
देश सव्वा वर्षात नक्षलवादमुक्त; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार
Ajit Pawar announces two and a half years formula for ministerial posts at NCP rally print politics news
मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांची घोषणा
Devendra Fadnavis Big announcement
शपथविधीआधी फडणवीसांची मोठी घोषणा! म्हणाले, “आज संध्याकाळनंतर आमचं सरकार…”

हेही वाचा : मुस्लिमांबाबत मोदींची भूमिका दुतोंडी – मुजफ्फर हुसेन

सत्ता आल्यास नरेंद्र मोदी पुढील ६ महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टिका केली. राम मंदिर झाल्यास देशात दंगे होतील असा अपप्रचार काँग्रेसने केला होता. मात्र देशात एकही दंगल काय तर खटके देखील उडाले नसल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधीनी काँग्रेस बरखास्त करण्याचे १९४७ मध्येच सांगितले होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसचे विसर्जन करा असे आवाहन योगींनी केले. ‘जो राम को लाए है हम उनको लाएंगे’, असे सांगत त्यांनी पुन्हा मोदींना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

ही निवडणूक राम भक्त आणि राष्ट्र द्रोही अशी होत आहे. तुम्हाला राम भक्त राज्य करणारे हवे की देशद्रोही राज्य करणारे हवे, याचा निर्णय घ्या आणि मोदींना विजयी करा असे आवाहन केले. आपल्या संपूर्ण भाषणात योगींचा भर राममंदिर, पाकिस्तान आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर होता.

माफियाराज संपविल्याचा दावा

उत्तरप्रदेशात बुलडोझर चालवून माफियाराज संपविल्याचे योगींनी सांगितले. आता रस्त्यावर नमाज पढली जात नाही, मशिदींवरील भोंगे गायब झाले आहेत. पुढील ५-६ वर्षांत असे काही प्रकार होते हे देखील विसरतील असे ते म्हणाले. हा नवा भारत आहे, हे त्यांना माहीत आहे. आता कोणी छेडत नाही, पण छेडलं तर आपण त्यांना सोडतही नाही, अशा शब्दांत योगी यांनी भारताची ताकद सांगितली.

हेही वाचा : बहुजन विकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन; पालकमंत्र्यांच्या नोटिशीची खिल्ली, फडणवीसांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते साडीचोळीसारखे!

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते साडीचोळीसारखे आहे. कोणीही त्यांना वेगळं करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशी येथील गागाभट्टांनी केला होता. आज काशीला आलात महाराष्ट्रातील राजांनी तिथल्या नदीकिनारी बनवलेले मोठमोठे घाट पाहायला मिळतील. त्या ठिकाणी मराठा समाज वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहे. वेगवेगळ्या संस्कृतीपरंपरांचे काशी हे केंद्रबिंदू आहे. आधी राममंदिर, आता काशीविश्वनाथ आणि त्यानंतर मथुरा अशी आपण पुढे वाटचाल करत आहोत, असेही योगी म्हणाले.

हेही वाचा : पालकमंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

सभेला तुफान गर्दी

सभेसाठी योगी दुपारी १ वाजता येणार होते. मात्र सकाळी ११ पासूनच लोकांची गर्दी जमू लागली होती. योगींचे दोन तास उशीरा म्हणजे ३ वाजता सभा स्थळी आगमन झाले. तेव्हापासून लोकं ताटकळत होती. रस्त्यावर देखील प्रचंड गर्दी होती. उन्हात देखील लोकं योगींना बघण्यासाठी उभे होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवावी लागली होती. त्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. सर्वाधिक गर्दी ही नालासोपारा, विरार, वसई मधील उत्तरभारतीय नागरिकांची होती.

Story img Loader