लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : आमदार गीता जैन मारहाण प्रकरणामुळे वादात सापडलेले तत्कालीन सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश अखेर पालिका आयुक्तानी दिले आहेत. याबाबत दोन्ही अतिरिक्त आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
मिरा रोड व भाईंदर शहराच्या आमदार गीता जैन यांनी सहा महिन्यापूर्वी (२० जुन २०२३ )पालिकेचे कनिष्ठ अभियंता संजय सोनी आणि शुभम पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती. यात हे कनिष्ठ अभियंता प्रभाग अधिकारी(क्रमांक ६)सचिन बच्छाव यांच्या आदेशानुसार केवळ विकासकाच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी आले असल्याचे आरोप गीता जैन यांनी त्यावेळी केले होते.या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर कनिष्ठ अभियंतानी पोलीस ठाण्यात जैन यांच्याविरोधात तक्रार दिली होती.परंतु यावर कारवाई होण्यापूर्वीच अभियंताने केलेली तक्रार मागे घेऊन हे संपूर्ण प्रकरण थंडावले होते.
आणखी वाचा-वसई, भाईंदर मध्ये २०२३ मध्ये एकूण ३७ हत्या; नालासोपारा येथील महिलेच्या हत्येचे गूढ कायम
दरम्यान, मागील पाच महिन्यापूर्वी वसचिन बच्छाव यांची शासनाने बदली केली असून हे दोन्ही अभियंता आजही पालिकेत काम करत आहेत.तर जैन यांनी देखील मागील दोन अधिवेशनात सचिन बच्छावची चौकशी करण्यासाठी लक्षवेधी सुचना मांडली होती