प्रसेनजीत इंगळे

विरार : महाराष्ट्र कामगार विभागाच्या शासनाच्या संकेतस्थळावर वसई तालुक्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. वसई, विरार शहरांत हजारो कंपन्या असतानाही केवळ ४७ कंपन्या असल्याची नोंद शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. याच माहितीच्या आधारे पालघर जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावरसुद्धा हीच माहिती प्रकाशित आहे. यामुळे वसईतील कामगारांच्या मूलभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

The government official and the police were cheated of lakhs of rupees by unknown scammers solhapur
शासकीय अधिकाऱ्यासह पोलिसाला अज्ञात भामट्यांकडून लाखोंचा गंडा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
government lanched ladki bahin yojana but woman not appointed in commitee set up to implement scheme
नागपूर : लाडक्या बहिणींच्या समितीवर सर्वच भाऊ
thousand msrtc employees of dharashiv division on strike
ST Bus Strike : एक हजार कामगार संपावर; लालपरीच्या पाचशे फेर्‍या रद्द, दैनंदिन २२ लाखांचे नुकसान
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Adivasis march to Vikas Bhavan for Pesa recruitment nashik news
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग
health department, Pune Municipal Corporation,
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात खांदेपालट, उपआरोग्य प्रमुखांच्या जबाबदाऱ्यात महापालिका आयुक्तांनी केले बदल
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश

वसई तालुका झपाटय़ाने विकसित होत आहे. त्यात मुबलक आणि स्वस्त दरात जागा उपलब्ध होत असल्याने आणि दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने मागील काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात अनेक छोटय़ामोठय़ा कंपन्या वसईत दाखल झाल्या आहेत. त्यात अनेक स्थानिक कंपन्यासुद्धा आहेत. वसई इंडस्ट्रीचे पदाधिकारी अशोक कोलासो यांनी माहिती दिली की, वसईत ७ हजारांहून अधिक कंपन्या आहेत. यातील बहुतांश कंपन्या या शासनाकडे नोंदणीकृत आहेत. असे असताना शासनाच्या संकेतस्थळावर केवळ ४७ कंपन्यांची नोंद असणे चुकीचे आहे. यामुळे शासनाने आपली माहिती अद्ययावत करावी, अशी मागणी होत आहे.

याच माहितीच्या आधारे पालघर जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर माहिती घेतली जाते. यातही हाच उल्लेख करण्यात आला आहे. पालघर जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर दररोज हजारो वापरकर्ते वेगवेगळय़ा कामांनिमित्त भेट देत असतात. त्यांनासुद्धा हीच अर्धवट माहिती उपलब्ध होत आहे. यामुळे वसईत हजारो कंपन्या असताना शासनाच्या संकेतस्थळावर केवळ ४७ कंपन्या दिसत असल्याने इतर कंपन्या बेकायदेशीर आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे वसईचे उपसंचालक नितीन गजपुरे यांनी माहिती दिली की, वसईत किमान २१०० कंपन्या नोंदणीकृत आहेत. संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत नसावी याबाबत माहिती घेऊन शासनाला कळविले जाईल, असे त्यांनी सांगितले.

अनेक कंपन्यांतील महिला कामगारांची नोंदच नाही 

संकेतस्थळावर असलेल्या माहितीनुसार वसई पूर्वेला १, पश्चिमेला १, सातवली २, नवघर १, बिलालपाडा १, कामण १, वालीव ५, तर विरारमध्ये ३२ कंपन्या असल्याची नोंद आहे. त्यात अनेक कंपन्यांनी केवळ पुरुष कामगारांची माहिती आहे तर अनेक कंपन्यांत महिला कामगार नसल्याची नोंद आहे. यामुळे कामगारांच्या मूलभूत सुविधांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक औद्योगिक क्षेत्रातील अभ्यासक, विद्यार्थी, काही कामगारांच्या संघटना या संकेतस्थळाचा वापर करत त्यांचे अहवाल तयार करत असतात. सदरची माहिती अपुरी असल्याने त्यांना वसईची औद्योगिक माहिती मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.