किल्ल्याचे ऐतिहासिक अवशेष झाडाझुडपांतून मोकळे करण्यासह सुशोभीकरणाचे काम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर :  वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडातून मोकळा करण्यासाठी चिमाजी अप्पांनी बांधलेला उत्तनजवळील जंजिरे धारावीचा किल्ला आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. या किल्ल्याच्या संवर्धनाकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून, किल्ल्याचे ऐतिहासिक अवशेष मिळवण्यासह सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना पर्यटनाच्या दृष्टीने नवी भेट मिळणार आहे.

चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयात धारावी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसई किल्ल्याच्या अगदी समोर उत्तन येथील चौक परिसरात जंजिरे धारावीह्ण किल्ला आहे. चौक जेटीकडून वर गावाकडे जाताना हा किल्ला लागतो. सध्या झुडपांच्या गर्द रानात तो  दडलेला असल्याने सहजासहजी नजरेत येत नाही. पोर्तुगीजांची समुद्रमार्गाने होणारी रसद तोडण्यासाठी चिमाजी अप्पांनी या किल्ल्याची बांधणी केली. हा टापू जिंकण्यासाठी चिमाजी अप्पांनी आठ वेळा प्रयत्न केला. नवव्या वेळी मात्र त्यांना यश मिळाले. ‘‘एका धारावीमुळे काय हालाहाल झाली, हे ईश्वरास ठाऊक’’ असे चिमाजी अप्पांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यावरून हा किल्ला किती महत्त्वाचा होता याची सहज कल्पना येते, अशी माहिती किल्ल्याच्या अभ्यासकाकडून देण्यात येते. हा किल्ला पूर्वी राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे नोंदणीकृत नसल्यामुळे पालिकेकडूनदेखील किल्ल्याकडे लक्ष देण्यात येत नव्हते.

मात्र किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या ठिकाणी शूरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय २० वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. या स्मारकाला जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी प्राप्त न झाल्याने संपूर्ण काम रखडले होते. त्यानंतर खासदार  राजन विचारे यांनी पुढाकार घेऊन पुतळय़ाकरिता आवश्यक गोष्टीचा पाठपुरावा करून संपूर्ण परवनाग्या मिळवल्या आहेत. त्यानुसार पुतळय़ाची स्थापनादेखील करण्यात आली असून परिसराच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे सुशोभीकरण करत असताना अनेक ऐतिहासिक गोष्टी पालिकेच्या निदर्शनास येऊ लागल्या आहेत. त्यामुळे  हा संपूर्ण किल्ला विकसित करून नागरिकांच्या पर्यटनाकरिता मोकळा करण्याचा निर्णय पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. त्यानुसार उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडाझुडपात दडलेले किल्ल्याचे अवशेष मोकळे करण्यात येत असून लवकरच या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व नागरिकांच्या निदर्शनास येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात ऐतिहासिक वास्तूला स्पर्श न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहे. शिवाय हा परिसर स्वच्छ करून यात काही विशेष आढळून येत आहे का याचीदेखील पाहणी केली जात आहे, असे पालिका आयुक्त  दिलीप ढोले यांनी सांगितले.