लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असतान वसईतील महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज असल्याचे समोर आले आहे. भाजपाकडून आम्हाला योग्य मान सन्मान मिळत नाही, विचारात घेतले जात नाही अशी तक्रार दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. या नाराजीमुळे तसेच आमंत्रण न मिळाल्याचे सांगत शुक्रवारी झालेल्या भाजप नेत्या स्मृती ईराणी यांच्या सभेलाही दोन्ही पक्षांचे नेते गैरहजर होते.

biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
ECI on Hitendra Thakur Party Symbol Whistle in Marathi
Hitendra Thakur Party Symbol : हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

वसई विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडित या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. सध्या स्नेहा दुबे यांचा प्रचार सुरू असला तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवेसना (शिंदे गट) भाजपावर नाराज आहेत. भाजप नेत्या स्मृती ईराणी यांची शुक्रवारी वसईत सभा झाली. या सभेला देखील दोन्ही पक्षांचे नेते गैरहजर होते. त्यामुळे महायुतीमध्ये असलेली धुसफूस समोर आली आहे.

आणखी वाचा-महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना

‘मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. मात्र मला कार्यक्रमाला कळवलंच नव्हतं तर मी कसा जाऊ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला. आम्हाला मान सन्मान दिला जात नाही, विचारात घेतले जात नाही, असा आरोपही मुळीक यांनी केला. शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनीही संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी अर्ज भरून आज १३ दिवस उलटून गेले. अद्यापही आम्हाला काहीच विचारण्यात आलेले नाही. स्मृती ईराणी यांच्या सभेचे अधिकृत आमंत्रण देण्यात आले नाही. कार्यक्रम सुरू असताना ऐनवेळी फोन केला गेला. त्यामुळे मी त्या सभेला गेलो नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. महायुतीला पोषक वातावरण आहे. परंतु एकांकी कारभार घातक ठरू शकतो, अशी भीती देखील तेंडोलकर यांनी व्यक्त केली

आणखी वाचा-वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा

नाराज नेत्यांची समजूत काढणार- भाजप

महायुती मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज असल्याचे भाजपाने मान्य केले आहे. आमच्याकडून निश्चित काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे समन्वय राहून गेला. परंतु मी या नाराज नेत्यांची भेट घेऊन निश्चितपणे त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले. आम्ही सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader