वसई– दुबईमध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून फसवूणक करण्यात आलेल्या एका तरुणीची भरोसा कक्षाच्या पोलिसांनी सुखरूप सुटका केली. गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखवून तिला एका एजटंने दुबईला पाठवून फसवणूक केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाईंदर मध्ये राहणारी २९ वर्षीय तरुणी उच्चशिक्षित असून चांगल्या नोकरीच्या शोधात होती. तिला दिल्लीतील एक दलाल (एजंट)च्या संपर्कात आली. दुबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये स्वागतिक (रिसेप्शनिस्ट) म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तिथे दिला महिन्याला सुमारे पावणे दोन लाख पगार मिळणार होता. परदेशी नोकरी कऱण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने ती तरूणी आनंदात होती. एप्रिल महिन्यात ती दुबईला गेली होती. मात्र दुबईला गेल्यावर तिची निराशा झाली.
हेही वाचा >>> विरोधकांच्या अपप्रचाराचा बविआला फटका
एजंटने तिचे पारपत्र काढून घेतले आणि एका हॉटेल मध्ये अन्य हलक्या कामासाठी ठेवले. राहण्याची देखील नीट व्यवस्था नव्हती. तिथे तिचा छळ सुरू झाला. तरी काहीतरी काम आहे म्हणून तिने सहन केले. मात्र दोन महिने तिचा छळ सुरू होता. तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिच्या कुटुंबियांनी दिल्लीमधील एजंटला संपर्क केला. मात्र त्याने तिला दाद दिली नाही. त्यामुळे पीडित तरुणीच्या आईने याबाबत मिरा भाईंदरर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईदर येखील भरोसा कक्षाची मदत घेतली.
…अशी केली सुटका
त्यानुसार भरोसा कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन मदत या पोर्टलवर माहिती देण्यास सांगितली. मुलगी हॉटेल मालकाच्या ताब्यात होती. दुबईतील कायद्यानुसार तिला तेथे काम करणे बंधनकारक होते. मात्र तेजश्री शिंदे यांनी हॉटेलमालकाशी वाटाघाटी सुरू केल्या. तरुणीची तब्येत बरी नसल्याचे सांगून तिला उपचारासाठी भारतात पाठविण्याबाबत मन वळवले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ यांनी केलेली मध्यस्ती आणि प्रयत्न यशस्वी ठरले आणि पीडित तरूणी सुखरूप भारतात आली
दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन
परदेशी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जाते. तेथील कायदे आणि नियम माहित नसल्याने भारतीय अडकून पडतात. त्यामुळे एजंटबरोबर असे व्यवहार करताना सावध रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.