वसई- वयोवृध्द महिलांना रस्त्यात गाठून त्यांना लुबाडणार्‍या दोघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने गुजराथ येथून अटक केली आहे. त्यांनी भाईंदर, मुंबई ठाणे परिसरात १० फवसणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ४ फेब्रुवारी रोजी भाईंदर येथे राहणार्‍या सरवणी कुमावत (६०) या महिलेला दोन अज्ञात इसमांनी रस्त्यात गाठले होते. त्यांना बोलण्या गुंतवून त्यांच्याकडील सुमारे ८० हजार रुपये सोन्याने दागिने काढून फसवणूक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसात अशाप्रकारचे अनेक गुन्हे घडले होते. या प्रकरणाचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यमवर्ती गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींची चेहरे निष्पन्न केले होते. मात्र ते कोण आहेत याची ओळख पटत नव्हती.

दरम्यान या आरोपींचे फोटो पोलिसांच्या एका व्हॉटसअपग्रुपवर टाकले होते. गुजराथच्या बडोदा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या भगवान पाटील या पोलीस अमलदाराने आरोपींचे फोटो ओळखले आणि त्यांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मानाभाईं मारवाडी (४५) आणि गोपीभाई मारवाडी (२३) या दोघांना अहमदाबाद येथील सरदार नगर पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली.

आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर मिरा भाईंदरच्या नवघर तसेच मुंबई, कल्याण, ठाणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे १० गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मध्यमर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी दिली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मध्यमर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे, प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.