केवळ २२६ कर्मचाऱ्यांवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा भार

विरार : वसई-विरार शहराचा मागील १० वर्षाच्या काळात लोकसंखेचा पसारा मोठ्या प्रमाणत वाढत गेला आहे. सध्या २० लाखांच्या अधिक लोकसंख्या गणली जात आहे. असे असताना नागरिकांच्या रक्षणाचा भार केवळ २२६ अग्निशमन कर्मचाऱ्यांवर आहे. त्यात केवळ एक अधिकारी पालिकेचा कारभार पाहत आहे. मागील १७ वर्षापासून या विभागाचा कोणताही विस्तार झाला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई-विरार पालिकेच्या स्थापनेआधीपासून कार्यरत असलेला पालिकेचा अग्निशमन विभागाचा कारभार अजूनही ठेका पद्धतीने हाकला जात आहे. शहरातील वाढत्या दुर्घटना पाहता  पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्य आणि पुरेशा मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. पण असे असतानाही पालिकेत केवळ २२३ कर्मचारी मागील १५ वर्षांच्या अधिक काळापासून ठेका पद्धतीने आपली सेवा देत आहेत. अजून यातील ९५ टक्केहून अधिक कर्मचारी हे शासकीय सेवेत रुजू झाले नाहीत. मागील १० वर्षांच्या काळात पालिकेने केवळ यंत्रणा वाढविण्याकडे भर दिला पण मनुष्यबळ मात्र तेवढेच आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरात तसेच ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या काळात सर्वाधिक ताण हा अग्निशमन विभागाकडे असतो. पालिकेकडे आचोळे, श्रीपास्थ, सनसिटी, पारनाका, फुलपाडा, विराट नगर, येथे केंद्र सुरू आहेत तर वालीव, पेल्हार, उमेलमान येथे जागेचा अभाव असल्याने केंद्र रखडले आहेत तसेच नवघर आणि जी जी कॉलेज उपकेंद्र प्रलंबित अजूनही कागदावरच उभे आहेत. त्यात श्रीपस्थ, आचोळे, सनसिटी हे तीन केंद्र अद्यावत आहेत. पालिकेकडे  ३० वाहने असून ४० मीटर एकच टर्न टेबल  एक लॅडर उपलब्ध आहे. तर ४५०० लिटर पाण्याचे सहा टेंडर होते यातील केवळ तीन कार्यरत आहेत. १२ हजार लिटर पाण्याची क्षमतेचे दोन ब्राऊझर फोम टेंडर, तेरा हजार  लिटर पाण्याच्या क्षमतेचे आट मिनी टेंडर होते त्यात केवळ चार कार्यरत आहेत. दोन हजार लिटर पाण्याच्या क्षमतेचे चार. तर क्विक रीस्पोंस व्हेकल केवळ एक,  आधुनिक जीवरक्षक साहित्य असलेली रेस्क््यू व्हॅन , हॅजमॅट  रेस्क््यू व्हॅन प्रत्येक एक, वाटर ब्राउज बीच मोनीटर एक तर  सात  दुचाकी आणि पाच बोट आधी यंत्रसामग्री आहे. मनुष्यबळच कमी असल्याने या यंत्रणांचा पुरेशा वापर होत नाही. पालिका आस्थापनेकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या अग्निशमन दलात १४७ फायरमन, ४२ चालक, २१ लीडिंग फायरमन, सात  उप अधिकारी. सात सेशन अधिकारी, इतक्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. पण यातील काही पदे पालिकेने ठेका पद्धतीने भरली आहेत.

पदे भरती करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे, त्याचा पाठपुरावा सुरु आहे शासनाची परवानगी मिळाली की, मनुष्यबळ वाढविले जाईल. -दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वसई-विरार महापालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crisis municipal emergency management akp