वसई : ‘सिनेमाला रेटिंग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा,’ अशा भूलथापांना बळी पडलेल्या विरारमधील डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.विरारमध्ये राहणारे फिर्यादी हे ४३ वर्षांचे असून, व्यवसायाने डॉक्टर आहेत. जानेवारीमध्ये ‘टेलिग्राम’वर त्यांची ओळख हाफिजा आर्या नावाच्या महिलेशी झाली. विविध सिनेमांना रेटिंग दिल्यास घरबसल्या पैसे मिळतील, असे तिने त्यांना सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ‘टेलिग्राम’वर सिनेमांना रेटिंग दिले. सुरुवातील फिर्यादी यांचा विश्वास बसावा यासाठी त्यांना काही पैसे देण्यात आले. त्यानंतर मात्र कमिशनची रक्कम जास्त आहे, तसेच प्राप्तिकर खात्याची धमकी देत वेगवेगळय़ा बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत फिर्यादी डॉक्टरने एक कोटी सात लाख ९० हजार रुपये भरले. मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सायबर गुन्हेगारांचा डॉक्टरला एक कोटी रुपयांचा गंडा, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
‘सिनेमाला रेटिंग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा,’ अशा भूलथापांना बळी पडलेल्या विरारमधील डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-06-2023 at 04:47 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber criminals extort rs one crore from doctor amy