Dahi Handi 2024 Celebration Mira Bhayandar  मिरा भाईंदर शहरात पुरुष गोविंदा पथकाप्रमाणे महिला गोपिका पथकात देखील वाढ होत असल्याची बाब समोर आली आहे.यामुळे शहरातील बड्या हंड्यामध्ये या महिलांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा भाईंदर शहरातील गोकुलकाला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.शहरातील चौका-चौकात बड्या हंड्याचे आयोजन केले जात असून त्या हंड्याना सलामी देण्यासाठी अनेक गोविंदा पथक हजेरी लावत असतात.प्रामुख्याने शहरात ५० हुन अधिक गोविंदा पथक आहेत.हे गोविंदा आधीपासूनच सराव करत असल्यामुळे दहीहंडीच्या दिवशी सहजच सहा  ते सात थराचे मानवी मनोरे उभे करतात असतात.त्यामुळे हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या कुतूहलाने  गर्दी करतात.यापूर्वी गोविंदा पथकात बोटावर मोजण्या इतक्या महिला गोपिका  समाविष्ट होत असत.पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून  या महिला मानवी मनोरे उभारत असल्याने कौतुकाच्या पात्र ठरत होत्या.मात्र अपेक्षेप्रमाणे आपली जागा किंबहुना सन्मान मिळत नसल्याची खंत बऱ्याच गोपिकांमध्ये निर्माण होत होती.

हेही वाचा >>> वसई : बेपत्ता पेट्रोलपंप मालकाची हत्या, चालक फरार

त्यामुळे साधारण आठ वर्षांपूर्वी (२०१७ साली) भाईंदर मधील एकविरा गोविंदा पथकातील आकाश सिंग आणि भाग्यश्री वराडकर यांच्या पुढाकाराने मिरा भाईंदर मधील पहिल्या महिला गोपिका पथकाची स्थापना करण्यात आली.हे पथक शहरातील हंड्यांना भेट देऊन  आपले मानवी मनोरे तयार करण्याचे कैशल्य दाखवू लागले.परिणामी अवघ्या काही वर्षातच हंडी व्यवस्थापकांकडून अशा महिलांसाठी  विशेष जागा आणि स्वतंत्र बक्षिसांची घोषणा करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या घडीला  या पथकानंतर  शहरात तीन तयार व दोन नवे असे एकूण ५ महिला गोपिका पथक असल्याचे समोर आले आहे.या पथकातील महिला देखील  मागील काही दिवसापासून नियमित सराव करत असून येत्या गोपाळकलेला नवा विक्रम रचणार असणार असल्याचा  विश्वास पथक प्रशिक्षकांना आहे.

शहरात प्रसिद्ध असलेली महिला गोविपा पथके :-

-आई एकविरा गोपिका पथक – अनुभव ८ वर्षे

-बाल हनुमान गोपिका पथक -छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2024 celebration female govinda squad increasing in mira bhayandar city zws