वसई – तरुणीची छेड काढणार्‍या एका तरुणाला माय-लेकीने भर रस्त्यात चोप दिला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला नालासोपारा येथे ही घटना घडली. या मारहाणीची चित्रफित सध्या वायरल झाली आहे.

हेही वाचा – वसई, विरारमध्ये दररोज सरासरी दोन वाहनांची चोरी

हेही वाचा – वसई : घरातील कॉटमध्ये महिलेचा कुजलेला मृतदेह, पतीने हत्या केल्याचा संशय

सोमवारी सायंकाळी एक तरुणी बाजारात जात असताना एका तरुणाने तिची छेड काढली होती. हा प्रकार या मुलीने तिच्या आईला सांगितला. त्या दोघींनी संध्याकाळी या मुलाला रस्त्यात गाठले आणि चोप दिला. नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन येथे ही घटना घडली. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पुर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने त्याची चर्चा रंगली आहे. मारहाणीची चित्रफितदेखील वायरल झाली आहे. या घटनेची अद्याप पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.

Story img Loader