वसई- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील बोळींज या १९ व्या पोलीस ठाण्याचे उदघाटन शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे झाले. अर्नाळा सागरी आणि विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली होती. नव्या आयुक्तालयात एकूण २० पोलीस ठाण्याची रचना करून शहरात ३ परिमंडळे तयार करण्यात आली होती.

वसई विरार शहरात मांडवी, पेल्हार, बोळींज, आचोळे आणि नायगाव तर मिरा भाईंदर मध्ये काशिगाव आदी ६ नवीन पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी आचोळे, पेल्हार, मांडवी, नायगाव आणि काशिगाव ही ५ पोलीस ठाणी तयार झाली होती. पंरतु बोळींज पोलीस ठाणे जागेअभावी रखलडले होते. अखेर जुलै महिन्यात बोळींज पोलीस ठाण्याची अधिसूचना काढण्यात आली आणि विरार पश्चिमेच्या म्हाडा येथील इमारतीत पोलीस ठाण्याला जागा देण्यात आली. मागील साडेतीन महिन्यात पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे काम पूर्ण करण्यात आले. राजेंद्र तेंडुलकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Inauguration of seven police stations under the jurisdiction of Pune City Police Commissionerate Pune news
सात नव्या पोलीस ठाण्याचे आज उदघाटन; ८१६ पदे, ६० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
Kidnap of priest, ransom, Karnataka, loksatta news,
पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

हेही वाचा >>> भाईंदर : नया नगर पोलीस ठाण्याबाहेर रक्तरंजित थरार; भररस्त्यात महिलेची पतीकडून हत्या

शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्याहून दुरदृश्यप्रणालीद्वारे या पोलीस ठाण्याचे उद्घटन केले. यावेळी विरार मध्ये आयोजित कार्यक्रमात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार हेमंत सवरा, आयुक्त मधुकर पांडे, पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, पुर्णीमी श्रींगी- चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी नालासोपार्‍याच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नवीन इमारतीचे देखील उद्घघाटन करण्यात आले.

पोलीस आयुक्तालय सुरू झाले तेव्हा २ हजार पदे होती. मागील वर्षी १ हजार पदे भरली आहेत. नुकताच १ हजार ०८२ पदांना मंजूरी मिळाली आहे, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी यावेळी सांगितले.

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. शाळा महाविद्यालयात पोलिसांनी अधिक लक्ष द्यावे, वाढते  सायबर गुन्हे लक्षात घेता जनजागृती करावी असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या नव्या पोलीस ठाण्याजवळील रस्ता रुंद करावा अशी सुचना त्यांनी आयुक्तांना केली.खासदार हेमंत सवरा यांनी देखील यावेळी सायबर गुनह्यांबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली.

हेही वाचा >>> शहरातील धूळ प्रदूषणावर मात्रा; वसई विरार महापालिकेची ‘फॉग कॅनन’ यंत्रणा लवकरच कार्यरत

बोळींज पोलीस ठाण्याची अधिसूचना जुलै महिन्यात काढण्यात आली. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे या दोघांची नियुक्ती करण्यात आली होती. जागेचा शोध घेण्यापासून पोलीस ठाण्याची सजावट या दोन अधिकार्‍यांनी केली. शुक्रवारी उद्घटनानंतर इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली

बोळींज पोलीस स्टेशनची ही आहे हद्द

विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसर ते संपूर्ण बोळींज , म्हाडा संकुल परिसर , ग्लोबल सिटी , विराट नगर , यशवंत नगर , तिरुपती नगर , गोकुळ टाऊनशिप , वायके नगर , एमबी इस्टेट , नारिंगी गाव , चिखलडोंगरी , मारंबळपाडा हे भाग आता बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार आहे. त्यासाठी पोलीस स्टेशनची अधिकृत हद्द निश्चिती पूर्ण झाली आहे.