वसई: महावितरणाच्या उघड्या डीपी ने आणखी एकाचा बळी घेतला आहे. सायकल चालवणाऱ्या ९ वर्षीय मुलाचा उघड्या डीपीला धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी वसई पश्चिमेच्या पारनाका येथील भास्कर परिसरात ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई पश्चिमेच्या भास्कर आळी परिसरात राहणारा ९ वर्षीय झियाउद्दीन शेख हा मुलगा गुरुवारी संध्याकाळी सायकल चालवत होता. पारनाका परिसरात रस्त्यालगत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरणने डीपी बॉक्स बसविला आहे. झियाऊद्दीन च्या सायकलने त्या डीपी बॉक्सला धडक दिली. त्याला विजेचा जोरात धक्का लागला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१० जून रोजी नालासोपाराच्या महेश पार्क येथे महावितरणाच्या पथदिव्याचा धक्का लागून रोहन कासकर या तरुणाचा मृत्यू झाला होता.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of an infant due to open dp of mahavitran in vasai amy