वसई: नालासोपारा येथील तुळींज परिसरातील एका बंद फ्लॅट मध्ये असलेल्या कॉटच्या आत चाळीस वर्षे महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. मेघा शाह असे या मालिलेचे नाव. आहे या घटनेनंतर तिचा पती हार्दिक शाह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज येथील सीता सदन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घरातून दुर्गंधी येत होती. सोमवारी ही दुर्गंधी वाढल्याने याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. तुळींज पोलिसांनी घराचे दार तोडून उघडले असता घरातील कॉटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. मेघा शहा असे या महिलेचे नाव आहे तिचा पती हार्दिक शहा हा फरार झाला आहे. त्याने हत्या केल्याचा  पोलिसांचा संशय आहे. शहा दांपत्य वीस दिवसापूर्वीच या इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये  राहण्यासाठी आले होते. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Story img Loader