लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे आणि अपघात मुक्त करण्यासाठी १२१ किलोमीटरपर्यंत व्हाइट टॉपिंग करण्याचे काम एक महिन्यात करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा पोकळ ठरली आहे. या घोषणेला महिना उलटून गेला तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. महामार्ग प्राधिकरणाने मात्र लवकरच काम सुरू करू असे सांगत सारवासारव केली आहे.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Aditya Thackeray statement regarding desalination project Mumbai
आमचे सरकार आल्यानंतर नि:क्षारीकरण प्रकल्प पुन्हा राबवणार; आदित्य ठाकरे
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार, पालघर, सुरत, गुजरात यासह विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या महामार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. मात्र मागील काही वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांची समस्या निर्माण होऊन महामार्ग अतिशय धोकादायक बनू लागला आहे. सातत्याने अपघाताच्या घटनाही समोर येत असतात. त्यावर उपाय म्हणून आता महामार्गावर व्हाइट टॉपिंग करण्यात येणार आहे. यात सुमारे १२१ किलोमीटरपर्यँतच्या महामार्गाचे व्हाइट टॉपिंग केले जाणार असून रस्त्यावर व्हाइट टॉपिंगचे छोटे छोटे पॅनल तयार केले जाणार आहेत. मात्र या कामाला सुरुवात झालेली नव्हती.

आणखी वाचा-वसई : अवकाळीने नुकसान झालेल्या ३४७ ग्रस्तांचे पंचनामे

३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी विरारमध्ये वसई जनता बॅंकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी विरारमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी वसई विरारला येण्याचा मार्ग खडतर असल्याची कबुली दिली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे नाव मी ‘डेथ ट्रॅप’ ठेवले होते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे येत्या एक महिन्यात १२१ किलोमीटरचा मुंबई-अहमदाबाद महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी या कामाबाबत तत्परता दाखवल्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केले होते.

मात्र आता महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरीही अजूनही महामार्गावर कामाला सुरुवात झाली नाही, त्यामुळे मंत्र्यांनी कामाची केलेली घोषणा ही केवळ हवेतच होती का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे.

आणखी वाचा-वसई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील छायाचित्रे वायरल, फरार आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक

१) महामार्गावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जाणार आहेत. यासाठी ६०० कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार असून १२१ किलोमीटर रस्त्यावर व्हाइट टॉपिंग, रस्ते ओलांडून प्रवास होऊ नये यासाठी घोडबंदर ते तलासरी अच्छाडपर्यंत १० पादचारी पूल, ३ अंडरपास पूल, कलव्हर्ट, पथदिवे दुरुस्ती व नूतनीकरण अशी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.

२) ‘आठवडाभरात काम सुरू होईल’

१२१ किलोमीटरचा रस्ता व्हाइट टॉपिंग करण्याच्या कामाची निविदा काढली असून ठेकेदारालासुद्धा कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. आठ ते दहा दिवसांत काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले जाणार असल्याचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.