वसई- लव्ह जिहाद आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आपल्या लिव्ह इन पार्टनरकडे ३० लाखांची खंडणी मागणार्‍या महिलेला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अन्वर इसामुद्दीन हुसेन (३६) असे फिर्यादीचे नाव असून तो मीरा रोड येथील नया नगर येथील रहिवासी आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार संध्या अदाटे (३३) या तरुणीसोबत तो डिसेंबर २०२३ पासून भाईंदर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र रहात होता. जानेवारीपासून संध्याने क्षुल्लक कारणावरून त्याच्याशी भांडण सुरू केले होते. त्यानंतर काही दिवसांतच तिने पैशाची मागणी करत त्रास देण्यास सुरुवात केली होती.

Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Akshara Singh Death Threat
“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

हेही वाचा – नालासोपारा द्वारका हॉटेल आग प्रकरण : ४ दिवसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – परदेशात नोकरीच्या आमिषाने दिडशे तरुणांची फसवणूक, नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक

लव्ह जिहाद, बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दिने ३० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार हुसेन याने केली आहे. हुसेन याचा मित्र नीलेश सोनी आणि इतरांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचा आरोपही हुसैन यांनी केला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी संध्या अदाटे विरोधात खंडणी, फसवणूक आदी विविध कमलांअतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी संध्या अदाटे हिचे यापूर्वीच लग्न झाले असून तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा प्रलंबित आहे.