वसई : मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याचे गुरूवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. काशिमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून या पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. आयुक्तालयातील हे १८ वे पोलीस ठाणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. त्यावेळी सुरुवातीला १३ पोलीस ठाणे कार्यान्वित होते. त्यावेळी ७ पोलीस ठाणी नव्याने निर्माण करणे प्रस्तावित होते. मागील ३ वर्षांत आचोळे, मांडवी, पेल्हार आणि नायगांव या ४ पोलीस ठाण्यांची निर्मिती कऱण्याती आली. आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या आतापर्यंत १७ होती. आज पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पो. ठाण्याचे विभाजन करुन १८ व्या काशिगांव पोलीस ठाण्याचे उद्घाटन पार पडले.

हेही वाचा…आता वर्सोवा-विरार नव्हे, उत्तन, भाईंदर-विरार सागरी सेतू

काशिगाव पोलीस ठाण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून इमारतीचा तळमजला भाडेतत्वावर प्राप्त झाला असून त्याचा भाडेखर्च पोलीस आयुक्तालयाच्या शासकीय निधीतुन करण्यात येणार आहे. तसेच या ईमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला आहे.

काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची संख्या प्रचंड होती. २०२३ मध्ये काशिमीरा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची संख्या ८०० तर अदखलपात्र गुन्हयांची संख्या ३ हजार १७० एवढी आहे. काशिगाव पोलीस ठाण्याच्या निर्मीतीमुळे काशिमीरा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी सुमारे ५० टक्के गुन्हयांचे विभाजन होईल आणि नागरिकांना न्याय देता येईल असा विश्वास पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार गिता जैन, माजी आमदार, मुजफर हुसैन, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर उपस्थित होते.

हेही वाचा…नायगाव उड्डाणपूलाच्या पथदिव्यांची जबाबदारी एमएमआरडीने झटकली

असे आहे नवीन काशिगाव पोलीस ठाणे

काशिगांव पोलीस ठाण्याची निर्मिती मुळ काशिमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. मूळ काशिमीरा पोलीस ठाण्याचे एकुण क्षेत्रफळ २९.९० चौरस किलोमीटर होते. त्यापैकी सुमारे २० चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ काशिगांव पोलीस ठाण्याकडे वर्ग झाले असून काशिमीरा पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ९.९० चौरस किलोमीटर एवढे आहे. नव्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या पूर्वेस वरसावे खाडीचा परिसर व वरसावे कडून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीपर्यंतचा भागाचा समावेश आहे.

पश्चिमेकडे शांतीवन सोसायटी. जी.सी.सी. क्लब रोड रित पॅराडाईजस ते हरीया डिम पार्क या दरम्यान असलेला रस्ता, तसेच मिरा-भाईंदर रोडची महेश इंडस्ट्रियल इस्टेट ते काशिमीरा नाका या दरम्यान असलेली पूर्ववाहीनी मार्गीका आहे. दक्षिणेस मनाली गाव, काशिगाव, जरी मरी मंदीर रोड व त्याला लागून असलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीपर्यंतचा परिसर. आणि उत्तरेस शांतीवन सोसायटी, जी.सी.सी. रोड, १५ नंबर बसस्टॉप, मनपा. मलनिस्सारण प्रकल्प आदींचा समावेश आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा…अखेर शिवसेनाच्या बेकायदेशीर कंटेनर शाखांना पालिकेच्या नोटीसा

आयुक्तालयातील पोलीस ठाणे

परिमंडळ १ (भाईंदर)

उत्तन सागरी

भाईंदर

नवघर

नया नगर

मिरा रोड

काशिमीरा

काशिगाव

हेही वाचा…वसई-विरारमध्ये उघड्या गटाराचा धोका कायम, नालासोपाऱ्यात गटारात अडकून महिला जखमी

परिमंडळ २ आणि ३ (वसई विरार)

वसई

माणिकपूर

वालीव

नायगाव

आचोळे

तुळींज

अर्नाळा सागरी

नालासोपारा

विरार

मांडवी

पेल्हार

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis virtually inaugurated kashigaon police station it is a divided from kashimira police station in mira bhayandar psg