वसई- विरारच्या श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मंदिराच्या पायर्‍या चढतांना धाप लागून त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगिते. विरार पूर्व जीवदानी गडावर जीवदानी मंदिरात नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मालगाडीवर केलेल्या दगडफेकीत चालक जखमी

रविवारी संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी अंधेरी येथील देविदास माली ( ४१) मित्र दुर्गाशंकर मनैरीया सोबत आले होते. पायथ्याशी असलेल्या गणेश मंदिरात दर्शन घेऊन तो पायऱ्यांच्या मार्गाने गड चढत होते. अर्ध्या वाटेवर देविदास यांना धाप लागली आणि छातीत दुखू लागले. त्यांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात आणि नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकऱणी विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotee who came for darshan at jivdani temple dies of heart attack zws
Show comments