लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईंदर : मकर संक्रात निमित्त पतंगाचा स्टॉल लावण्यासाठी झालेल्या वादात भाजपाच्या दोन माजी नगरसेविका आपापसात भिडल्या आहेत. या प्रकरणी एका नगरसेविकेच्या तक्रारीवरून दुसरी नगरसेविका आणि तिच्या पतीविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड येथील शांती नगर सेक्टर ७ परिसरात दरवर्षी संक्रांत निमित्त पतंगगीचे स्टॉल लावण्यात येतात. विपिन वोरा या विक्रेत्याला पालिकेने येथील स्वामी नारायण मंदिराबाहेर स्टॉल लावण्याची परवानगी दिली आह. मात्र सध्यस्थितीत या ठिकाणी एका बाजूला फेरीवाले आणि दुसऱ्या बाजूला जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे स्टॉलची मूळ जागा अडवण्यात आल्यामुळे विपेन वोरा हे मदतीसाठी स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका हेतल परमार यांच्या गेले होते.

आणखी वाचा-भाईंदर : अल्पवयीन मुलीची रिक्षाचालकाने काढली छेड, नागरिकांनी चोप देत काढली धिंड

सोमवारी संध्याकाळी हेतल परमार या फेरिवाल्यांना हटविण्यासाठी गेल्या. मात्रे ते फेरिवाले माजी नगरसेविका दिप्ती भट यांचे समर्थक होते. त्यामुळे दिप्ती भट देखील आल्या. दोन्ही माजी नगरसेविका समोरासमोर आल्या आणि भांडणाला सुरावत झाली. या प्रकरणात हेतल परमार यांच्या तक्रारीवरून दीप्ती भट आणि त्यांचे शेखर भट यांच्याविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७९आणि ३(५) अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला

दिप्ती भट यांनी आरोप फेटाळले

शांती नगर सेक्टर ७ जवळील स्वामी नारायण मंदिरा बाहेर स्टॉल साठी जेष्ठ नागरिकांना धमकावून बाकडे हटवण्यात येत असल्याची तक्रार काही ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मी आणि माझे पती महापालिकेच्या फेरीवाला पथकासोबत त्या ठिकाणी हजर होतो. दरम्यान याबाबतची चर्चा सुरु असतानाच हेतल परमार त्या ठिकाणी येऊन आमच्यावर खोट्या आरोप करू लागल्या. आम्हाला देखील शिविगाळ करून धमकावण्यात आले आहे. मी देखील या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असे माजी नगरसेविका दीप्ती भट यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over setting up kite stall two former bjp corporators clashed mrj