पालिकेने ‘बफिंग’चा कचरा न उचलल्यास औद्योगिक वसाहती बंद ठेवणार असल्याचा उद्योजकांचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधून निघणारा ‘बिफग’चा कचरा उचलण्यास पालिकेने नकार दिल्यामुळे या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न उभा राहिला आहे.  शहरात पडून असलेल्या या कचऱ्यावर पालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखाना मालकांमध्ये नाराजी पसरली असून याविरुध्द आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘बिफग’च्या कचऱ्यामुळे पालिका प्रशासन आणि औद्योगिक वसाहतीधारक आमने-सामने आले असून वाद चिघळत जात असल्याचे दिसून येत आहे.मीरा-भाईंदर शहर हे पूर्वीपासून पोलाद उद्योगासाठी नावाजलेले शहर आहे. या शहरात साधारण दोन हजारहून अधिक स्टील वसाहती असून सुमारे ९०० बिफग केंद्रे आहेत. त्यामुळे या प्रतिदिन साधारण ६० ते ७० टन हा ‘बिफग’चा कचरा या कारखान्यातून निघतो. पूर्वी हा कचरा पालिकेकडून उचलण्यात येत होता. मात्र हा कचरा ज्वलनशील असल्यामुळे पालिकेच्या घनकचरा प्रकल्पात आग लागण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने पालिकेकडून हा कचरा न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

 राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘बिफग’च्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता मुंबई येथील तळोजा येथे उभारण्यात आलेल्या केंद्रावर हा कचरा पाठवण्याच्या सूचना पालिकेकडून औद्योगिक वसाहतीधारकांना देण्यात आल्या. मात्र औद्योगिक वसाहतीनी या आदेशाचे पालन करणार नसल्याचे जाहीर करत विरोध दर्शवला. त्यामुळे यावर तोडगा काढण्याकरिता कारखानदार व पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बिफग कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास पालिकेकडून शुल्क आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर कारखानदार संघटनेकडून भाईंदर पश्चिमेच्या मंगलमूर्ती हॉलमध्ये गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मीरा-भाईंदरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी स्टील भांडी निर्मितीची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखले जात होते परंतु मागच्या काही वर्षांत सुविधा मिळत नसताना आकारल्या जाणाऱ्या करांमुळे स्टील कारखाने इतर राज्यांत स्थलांतरित होत असल्याचे मत कारखानदारांनी व्यक्त केले. करोनाच्या आर्थिक संकटात बिफग कचरा शुल्काचे ओझे टाकले जात असल्याने तो रद्द करावा अशी भूमिका घेण्यात आली. अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात कारखानदार काम बंद आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र स्टील उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पांडे यांनी दिला आहे.

बिफग’ व्यावसायिकांची मागणी

मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून बिफगचा कचरा उचलण्यास नकार देण्यात आल्यामुळे बिफग व्यावसायिक नाराज झाले आहेत. व्यावसायिकांच्या मते ते गेल्या कित्येक वर्षांपासून येथे व्यवसाय करत असून पालिकेला कचरा करदेखील भरत आहे. मात्र आता देण्यात आलेल्या नव्या सूचनामुळे या बिफगच्या कचऱ्याची विल्हेवाट करण्याकरिता तो मुंबई येथील तळोजाला पाठवण्याकरिता मोठा खर्च उचलावा लागू शकतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय पालिकेनेच घ्यावा अशी बिफग व्यावसायिकांनी मागणी केली आहे.

या संदर्भात बिफग व्यावसायिकांशी चर्चा करण्याकरिता पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. या वेळी महानगरपालिकेच्या हितासाठी आवश्यक असलेला निर्णय घेण्यात येईल.

अजित मुठे, उपायुक्त, आरोग्य विभाग